कोरियन ब्युटी किंवा के-ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरियातील नाविन्यपूर्ण उत्पादनांनी जगाला वेड लावले आहे. परंतु ट्रेंडी शीट मास्क आणि आकर्षक पॅकेजिंगच्या पलीकडे निरोगी, तेजस्वी त्वचा मिळवणे हा त्यामागील उद्देश आहे.

द एस्थेटिक क्लिनिक्सच्या कॉस्मेटिक डर्माटॉलॉजिस् आणि डर्माटो-सर्जन विभागाच्या कन्सलटंट डर्माटलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना के-ब्युटी टिप्स हे निरोगी त्वचा राखण्यात मदत करू शकतात. कारण त्यामध्ये नैसर्गिक घटक, प्रगत स्किनकेअर तंत्रज्ञान आणि स्किनकेअर दिनचर्येबाबत जागरूक दृष्टीकोन समाविष्ट आहे.

तुम्हालाही कोरियन लोकांसारखी Glass skin मिळवायची असेल तर येथे काही ब्युटी टिप्स दिल्या आहेत. Glass skin म्हणजे डागविरहित चमकदार त्वचा जी निरोगी आणि हायड्रेटेड दिसते.

क्लिंजिंगचा फायदा

के-ब्युटी मेकअप, सनस्क्रीन आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी दोनदा क्लिंजिंग करण्याचा फायदा होतो. मेकअप आणि सनस्क्रीन काढून टाकण्यासाठी तेल आधारित क्लीन्सरसह (oil-based cleanser)सुरुवात करा. तुमची त्वचा ताजेतवानी राहण्यासाठी पाणी आधारित क्लीन्सरसह (water-based cleanser) वापरा.

हेही वाचा – Jugaad Video: मीठ खरेदी केल्यानंतर एकदा स्वयंपाकघरातील लाटण्यावर टाकून पाहा; काय कमाल झाली एकदा पाहाच!

एक्सफोलिएशन करा

त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि नवीन पेशींच्या निर्मितीस चालना देण्यासाठी सौम्य एक्सफोलिएशन ही गुरुकिल्ली आहे. कोरियन ब्युटी उत्पादनांमध्ये केमीकल पीलपासन सौम्य स्क्रबपर्यंत विविध प्रकारचे एक्सफोलिएटिंग पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकाराला साजेसे एखादे निवडा आणि जास्त एक्सफोलिएशन करणे टाळा कारण त्वचेला त्रास होऊ शकतो.

हायड्रेशन महत्त्वाचे

के-ब्युटी टिप्सनुसार त्वचेतील पाण्याची पातळी दिवसभर कायम राहिली पाहिजे. टोनर्स, एसेन्सेस आणि मॉइश्चरायझर्स लेयरिंग केल्याने त्वचा निरोगी राहते आणि चेहऱ्यावरील तेज कायम राहते. टोनर्स त्वचेला पुढील उत्पादनांसाठी तयार करतात, तर एसेन्सेस त्वचेची पाण्याची पातळी कायम राखतात. मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा कमी होऊ देत नाही जेणेकरून तुमची त्वचा मऊ होईल.

हेही वाचा – उन्हाळ्यात दररोज कैरी खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? वाचा, डॉक्टर काय सांगतात

शीट मास्क

के-ब्युटी रुटीनमध्ये शीट मास्क हे एक प्रमुख घटक आहेत. तुम्ही निवडलेल्या मास्कनुसार त्वचेतील पाण्याची पातळी राखते. त्वरीत त्वचा उजळ होते किंवा मुलायम होते.

एसपीएफ

के-ब्युटी टिप्सनुसार सूर्य किरणांपासून संरक्षण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. कोरियन लोक फक्त जास्त ऊन असेल तरच नव्हे नियमितपणे सनस्क्रीन वापरतात तर एसपीएफ ३० किंवा त्याहून अधिक ब्रॉड-स्पेक्ट्रम असलेले सनस्क्रीन निवडा आणि दिवसभर त्वचेवर राहू द्या.

फर्मेंटेशन

फर्मेंटेशन हा के-ब्युटीमधील लोकप्रिय ट्रेंड आहे. हे घटक त्वचेवरील इतर उत्पादनांना शोषून घेण्यास आणि त्वचेचे तारुण्य टिकवण्यासाठी आणि उजळ करण्यासाठी मदत करते. किमची, भात, सोया अशा आंबलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

हेही वाचा – आंबा खाल्ल्याने मधुमेहापासून वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो फायदा; पण ‘ही’ खाण्याची पद्धत व रेसिपी नीट बघा

फेशिअल मिस्ट, मसाजर आणि स्लींपिंग मास्क

तुमची त्वचा आणि स्किन केअर रुटीन सुधारण्यासाठी विविध अतिरिक्त साधने आणि तंत्रे के-ब्युटीमध्ये उपलब्ध. फेशिअल मिस्ट दिवसभर तुमची त्वचा ताजेतवाने ठेवतेय. फेशिअल मसाजर हे चेहऱ्याला मालिश करून रक्ताभिसरण सुधारते. स्लीपिंग मास्क हे सकाळी त्वचा चमकण्यासाठी रात्रभर हायड्रेशन देतात.

लक्षात ठेवा, सुंदर त्वचा केवळ उत्पादन वापरून मिळत नाही. त्यासाठी निरोगी आहार, पुरेशी झोप आणि तणाव कमी करणे या सर्व गोष्टी देखील योगदान देतात. निरोगी त्वचा मिळवणे हा एक प्रवास आहे. के ब्युटी टिप्स वापरून पाहा आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे ते ओळखा. थोडा सयंम आणि सातत्य ठेवा. आपल्या त्वचेचे लाड आणि पोषण करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्या.