लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात. हे नवीन आयुष्य सुरू करण्यापूर्वी एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयी जाणून घेणे गरजेचे असते. भारतीय समाज व्यवस्थेचा विचार केला तर लग्नानंतर मुलीचे आयुष्य बदलते. अशात लग्नाला होकार देण्यापूर्वी जोडीदाराबरोबर काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे असते. या काही गोष्टींवर चर्चा केल्यानंतर वैवाहिक जीवनातील अडचणी टाळता येऊ शकतात. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

जास्त अपेक्षा न ठेवणे

कोणत्याही नात्यात दोन व्यक्तींच्या एकमेकांवर भरपूर अपेक्षा असतात. जर जोडीदाराने अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर व्यक्तीला दु:ख होऊ शकते. त्यामुळे लग्नाला होकार देण्यापूर्वीच मुलीने जोडीदाराला तिच्या जबाबदारीविषयी सांगितले पाहिजे, ज्यामुळे मुलीवर अपेक्षांचं ओझं राहणार नाही.

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests
महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

तुमच्या नोकरीविषयी बोला

जर तुम्ही नोकरी करत असाल तर बिनधास्तपणे जोडीदाराशी बोला. तुमच्या नोकरी आणि कामाविषयी सांगा, ज्यामुळे भविष्यात वैवाहिक आयुष्यात अडचणी येणार नाहीत. नोकरी आणि घर सांभाळताना जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा ठेवा, ज्यामुळे नोकरी करताना घर सांभाळणे सोपे जाईल.

हेही वाचा : Breakup Signs : जर ही लक्षणे दिसत असतील, तर तुमचे नाते फार काळ टिकणार नाही; वेळीच व्हा सावध …

वॉशरूम आणि बेडरूम स्वच्छता

जर तुम्ही स्वच्छताप्रिय असाल तर वॉशरूम आणि बेडरूम स्वच्छ ठेवण्याविषयी जोडीदाराबरोबर बोला. यामुळे भविष्यात लग्नानंतर एकच वॉशरूम किंवा बेडरूम शेअर करताना तुम्हाला अडचणी येणार नाही आणि जोडीदारसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे स्वच्छता ठेवेल.

जबाबदारी वाटून घ्या

लग्नानंतर घरातील जबाबदारी वाटून घ्या, ज्यामुळे एकावर कधीही ओव्हर लोड येणार नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा जोडीदारही नोकरी करत असेल तर दोघांचा जॉब टाइम आणि सुट्ट्या बघून घरकाम आणि घरातील लहानमोठ्या जबाबदारी वाटून घ्या.

मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहा

लग्नानंतर अनेकदा मुली संसारात इतक्या रमतात की, मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात नसतात, पण हे चुकीचे आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मित्र-मैत्रिणींच्या सहवासाची आवश्यकता भासते. त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने तुम्ही बोलू शकता. वैवाहिक आयुष्यातील अडचणी त्यांच्याबरोबर शेअर करू शकता. त्यामुळे लग्नाला होकार देण्याआधी भविष्यात जुन्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहणार असल्याचे जोडीदाराला सांगा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)