धोत्रा शंकर देवाला अर्पण केला जातो, परंतु काही लोकांना माहित असेल की त्याची विषारी काटेरी पाने आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरू शकतात. खरं तर यात असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे टक्कल पडण्याची समस्याही दूर होऊ शकते. यासोबतच कानदुखी आणि जखमा भरण्यासही मदत होते. धोत्रा आणि त्याच्या पानांचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया याशिवाय धोत्राच्या पानांचे कोणते फायदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांधेदुखीतही मदत होईल
धोत्रामध्ये असलेले गुणधर्म जखम भरून येण्‍यापासून शारीरिक क्षमता वाढवण्‍यासाठी प्रभावी ठरतात. याच्या वापराने पुरुषांच्या सांधेदुखीपासून शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. म्हणजेच हे पान विषारी असले तरी त्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत.

डोक्यावरचे केस गळणार नाहीत
डोक्याचे केस गळल्यामुळेही बहुतेक लोक त्रस्त असतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी विविध उपायांचा अवलंब केला जातो. यानंतरही केसगळतीची तक्रार कमी होत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही धोत्राच्या पानांचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आणखी वाचा : ऑफिसमध्ये एक्स बरोबर काम करावं लागतंय, परिस्थिती कशी हाताळायची?

जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त
कोणत्याही प्रकारच्या जखमा भरून काढण्यासाठी धोत्राची पाने खूप प्रभावी आहेत. पण लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर ती लागू करू नका. डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार, त्याचा रस कापलेल्या आणि फाटलेल्या ठिकाणी लावा.

कानदुखीवरही हे पान उपयुक्त आहे
याशिवाय जर तुम्हाला तुमच्या कानात दुखत असेल तर ही पान तुमची समस्या दूर करू शकते. खऱं तर यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म कानदुखीची समस्या कमी करू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits datura leaves for hair ears and injuries know no ganjapan prp
First published on: 27-03-2022 at 00:18 IST