भारतीय खाद्यसंस्कृतीत प्रत्येक पदार्थाला आणि घटकाला विशेष महत्त्व आहे. जसं प्रत्येक कोसावर भाषा बदलली जाते, त्याचप्रमाणे काही ठिकाणी एखादा पदार्थ करण्याची पद्धत किंवा त्याचं महत्त्व बदललं जातं. कडधान्यांमधील कुळीथ हे फार कमी ठिकाणी खाल्ले जातात. परंतु, कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील प्रत्येक घरात कुळथाची पिठी (पिठलं) आवर्जुन केली जाते. त्यामुळे आजही मुंबईत स्थायिक असलेल्या कोकणी माणसाच्या घरात कुथळाची पिठी ही हमखास पाहायला मिळेल. विशेष म्हणजे या कुथळाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आज कुळीथ

खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.

कोकणात कुळीथ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कडधान्याला देशावर हुलगे असं म्हणतात. परंतु, हे अत्यंत उष्ण असल्यामुळे रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणे टाळावे.

१. आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करुन रुग्णास दिल्यास त्याला आराम मिळतो. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की उत्तम कढण तयार होते.

२. कुळथाचं कढण वातनाशक असून जेवणातील रुची उत्पन्न करणारे आहे.

३. कुळथाच्या काढ्याने लघवी साफ होते.

४. मूतखडा झाल्यास कुळथापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरतं.

५. कुळथाच्या काढ्यात थोडी सुंठ व पादेलोण मिसळून प्यावा. लघवी मोकळी होते. तात्पुरता आराम पडतो.

६. लघवी करण्यास त्रास होत असल्यास किंवा जळजळ होत असल्याच कुळथाच्या सेवनाने आराम मिळतो.

७. खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे.

८. गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा उपयुक्त आहे.

या आजारात कुळथाचं सेवन करु नका.

१.कोरडा किंवा सुकलेल्या कफ विकारात कुळीथ उपयोगी नाही.

२. रक्ती मूळव्याध, आप्लपित्त विकार असलेल्यांनी कुळीथ खाऊ नये.

३. रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.)