आपली त्वचा सुंदर, तजेलदार दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण स्किनकेअर रुटीन ही प्रक्रिया बऱ्याचदा एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अनेकांसाठी गोंधळात टाकणारी असू शकते. म्हणूनच आपल्या स्किनकेअर रुटीनला योग्यरित्या सुरूवात करायची असेल तर त्यासाठी एखाद्याने सर्वप्रथम आपल्या त्वचेचा प्रकार, आवश्यकता जाणून आणि समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यासाठी योग्य उत्पादनं निवडणं आणि वापरणं आवश्यक आहे. मात्र, या सगळ्यात काही मूलभूत गोष्टी आहेत. ज्या लक्षात ठेवून आपण त्वचेची योग्यरीत्या काळजी घेऊ शकतो. याचबाबत अधिकची माहिती आज आपण त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निकिता सोनावणे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉ. निकिता यांनी फेस सीरम लावण्यासाठी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स काय आहेत? पाहूया
- डॉ.निकिता आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहितात कि, “आपल्या चेहऱ्यावर सर्वप्रथम फिकट किंवा हलकं सीरम आणि त्यानंतर जाड किंवा जड सीरम लावावं”
- जर तुम्हाला तुमच्या सीरमच्या कन्सिस्टन्सीबद्दल खात्री नसेल, तर तुम्ही तुमच्या हाताच्या मागील बाजूस काही थेंब लावून पाहू शकता की कोणतं सीरम हलकं आहे आणि कोणतं जड
- जर तुम्ही अॅसिड-बेस्ड सीरम किंवा टोनर वापरत असाल तर ते इतर सीरमच्या आधी लावावं.
- दोनपेक्षा जास्त सीरम वापरू नका. ते तितके प्रभावी ठरणार नाहीत.
- जर तुम्ही अनेक सीरम वापरत असाल तर ती वेगवेगळ्या प्रॉब्लेम एरियाझवर प्रभावीपणे काम करणारी असावीत.
- तुम्ही एकच अॅक्टीव्ह इंग्रिडिएंट वारंवार वापरत नाही याची खात्री करा. त्यासाठी, तुमच्या फॉर्म्युलेशनची इंग्रिडिएंट्स तपासा. जास्त हायलूरोनिक अॅसिडमुळे ब्रेक आउट होऊ शकतं.
मिक्सिंग गाईड
- डॉ. निकिता यांच्या मते, AHA/BHA हे रेटिनॉलसह वापरायला हवं. व्हिटॅमिन सी आणि रेटिनॉल एक चांगलं कॉम्बिनेशन आहे.
- हायलूरोनिक अॅसिड + व्हिटॅमिन सी, नायासिनामाईड + रेटिनॉल हे इतर सीरम आहेत जे एकत्र उत्तम काम करतात.