गर्भधारणेनंतर पोटातील लठ्ठपणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रसूतीनंतर स्त्रिया अनेकदा त्यांच्या वजनाबद्दल चिंतेत असतात. वाढलेले पोट नुसतेच त्रास देत नाही तर दिसायलाही बरे वाटत नाही. ओटीपोटाचा लठ्ठपणा कालांतराने कमी होत असला, तरी तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर तुमचे पोट पूर्णपणे सपाट होऊ शकत नाही. यासाठी तुम्ही घरच्या घरी जिम न करता काही घरगुती उपायांच्या मदतीने तुमचे वजन आणि पोटाची चरबी कमी करू शकता. चला तर मग ते कसे करायचे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात फायबर वाढवा तसेच, ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरतो. अशावेळी तुम्ही त्याचे सेवन करा. याशिवाय, प्रसूतीनंतर तुम्ही ओव्याचे पाणी अवश्य घ्यावे, ते तुमचे चयापचय सुधारते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होते. ओव्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे शरीराला आंतरिकरित्या पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Better and easier options to regain fitness after pregnancy do these 2 exercises you should know scsm
First published on: 03-12-2021 at 17:58 IST