बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयकडून सुदृढ आरोग्याबाबत व्यक्त केलेले अनुमान हे तंतोतंत खरे असते हा दावा अमेरिकेतील अभ्यासकांनी खोटा ठरविला आहे. बीएमआय आरोग्याबाबत अचूक अंदाज वर्तविते हा दावा चुकीचा असल्याने त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून बॉडी मास इंडेक्स(बीएमआय)ने निरोगी व्यक्तीची परिभाषा ही त्याची उंची आणि वजन यांच्या मोजमापावरून केली आहे. पण कॅलिफोर्निया विद्यापीठच्या संशोधकांना मात्र बीएमआयकडून आरोग्याचे केले गेलेले मोजमाप हे चुकीचे असल्याचे आढळले आहे. काही लोक निरोगी असूनही केवळ बीएमआयमुळे ते निरोगी नसल्याचे सांगितले जाते. अनेकांच्या मृत्यूमागे लठ्ठपणा हे कारण असते, पण संकलित माहितीत मात्र अतिवजन आणि लठ्ठपणा असलेल्या कोटय़वधी व्यक्ती निरोगी असल्याचे नमूद केल्याचे यूसीएलएचे साहाय्यक प्राध्यापक आणि ‘ए जनेट’चे मुख्य लेखक तोमीयामा यांचे म्हणणे आहे.
अभ्यासकांनी बीएमआयच्या माध्यमातून निरोगी व्यक्तीचे केले जाणारे विश्लेषणाच्या विविध कारणांचा अभ्यास केला. त्यानुसार त्या व्यक्तीच्या किलोग्रॅममधील वजनाचे आणि त्यांच्या मीटरमध्ये मोजमाप करण्यात आलेल्या उंचीच्या भागाकारासोबत अन्य परीक्षणे ज्यात रक्तदाब आणि ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल आणि ग्लिसरॉलसोबत तीन आम्ल पदार्थाचे मोजमाप आणि अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य आणि पौष्टिक आहार तपासणी सर्वेक्षणातील संकलित माहितीचादेखील अभ्यास करण्यात आला.
या संशोधनात अध्र्याहून अधिक अमेरिकन नागरिकांचे वजन अधिक आहे, (४७.४ टक्के किंवा ३४.५ लाख लोक) बीएमआयनुसार ते सदृढ असून १९.८ लाख नागरिकांना ‘लठ्ठ’ समजण्यात आले आहे. त्यामुळे बीएमआयच्या भाकितानुसार आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही समूहातील लोक स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी करत असलेला खर्च हा अनाठायी असून आरोग्य सेवेच्या नावाखाली त्याच्यांकडून आकारण्यात येणारे पैसे अन्यायकारक असल्याचे मत तोमीयामा यांनी व्यक्त केले आहे. २०.७ लाख लोकांपैकी जवळपास ३० टक्के जे बीएमआयनुसार ‘सामान्य’ आहेत, अन्य संकलित माहितीनुसार ते ‘सुदृढ’ नसण्याचा धोका हा अधिक असल्याचे समोर येत आहे.
बीएमआयनुसार १८.५ आणि २४.९९ च्या दरम्यान असलेली व्यक्ती ही सामान्य आहे. पण संशोधनात हेच म्हटले आहे की, बीएमआयनुसार सामान्य असणे म्हणजे सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने मिळवलेले प्राथमिक यश आहे. हे संशोधन ‘लठ्ठपणावरील’ आतंरराष्ट्रीय जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)