Healthy Lunch Ideas For Kids : शाळा, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस डब्यामध्ये नक्की द्यायचं काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. कारण- आपण जे डब्यात देतो, त्याचा मेंदूच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा आपण विचार करतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात होत असतो. लहान पण पोषक तत्वांनी परिपूर्ण असे अन्न तुम्हाला लक्ष केंद्रित करणे, तुमची स्मरणशक्ती चांगली राखणे आणि दिवसभर ऊर्जा प्रदान करणे यांसाठी मदत करू शकतात.त्यामुळे आम्ही क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि कन्सल्टंट डायटिशियन कनिका मल्होत्रा यांच्याकडे गेलो आणि विशेषतः विद्यार्थी आणि ज्यांना त्यांचा मेंदू सर्वोत्तम प्रकारे काम करावा असे वाटत असेल त्यांच्यासाठी काही स्मार्ट टिफिन आयडिया शेअर करण्यास सांगितले.
मेंदूच्या तल्लखतेसाठी टिफिन आयडिया…
१. बाजरीचा उपमा आणि मिक्स स्प्राउट्स सलाड
बाजरीचा उपमा करा आणि फायबर, जीवनसत्त्वे मिळविण्यासाठी त्यात भाज्या घाला. तसेच चाट मसाला टाकलेल्या स्प्राउट्स सॅलडबरोबर खा. बाजरी खाल्ल्याने शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते. तर स्प्राउट्स मेंदूतील प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स वाढवतात.
२. फळांचा सलाड आणि डाळींची इडली
डाळ आणि भाज्यांपासून बनवलेली प्रथिनेयुक्त इडली पचायला हलकी असते. त्याचबरोबर तुम्ही फळांचे सलाड द्या, जे ऑक्सिडेटिव्ह ताण नियंत्रित करून आणि दीर्घकाळापर्यंत तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यास साह्यभूत ठरेल. या आयडियांचा अवलंब करून बनवलेल्या टिफिनमध्ये अँटीऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात असेल.
३. हम्मस कबाब
हम्मस हा चणे, तिळाचे तेल, लिंबाचा रस व मिरी यांचा वापर करून बनवलेला एक चविष्ट पदार्थ आहे. हम्मसमुळे शरीराला आरोग्यदायी चरबी (हेल्दी फॅट्स) मिळतात. त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेला चालना मिळते.
४. दही-चणा चाट
उकडलेल्या चण्यांत दही, काकडी, चाट मसाला मिसळून तयार केलेला टिफिन प्रथिनांनी युक्त असतो, जो तुम्हाला ताजेतवाने होण्यास मदत करतो. दह्यामधील प्रो-बायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात, जे मेंदूच्या आरोग्याशी जोडलेले असतात. तसेच चणे फायबर आणि स्थिर ऊर्जा प्रदान करतात.
५. चटणी, डाळिंबासह ओट्स पॅटीज
कुरकुरीत ओट्स पॅटीजमध्ये भरपूर फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब असतात,जे तुमच्या मेंदूला दीर्घकाळ टिकणारे इंधन पुरवतात. चवीसाठी ते पुदिना किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर खा आणि अतिरिक्त अँटिऑक्सिडंट्स मिळविण्यासाठी थोडे डाळिंबसुद्धा त्यात घाला.
६. सातूचा पराठा
सातूचा पराठा केवळ चविष्टच नाही, तर बनवायलाही सोपा असतो. त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. कारण- त्यामध्ये प्रथिने, लोह असते, ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत पार पडते आणि आणि सहनशक्ती वाढते.
७. मिक्स पदार्थ
क्विनोआ, बाजरी, परतलेलं पालक, भाजलेले हरभरे आणि पुदीना-कोथिंबीर घातलेली दही चटणी, असे वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेले रंगीत बाऊल फक्त सुंदरच दिसत नाही. तर त्यातील पदार्थ मेंदूसाठी उपयुक्त अशा पोषक तत्त्वांनी भरलेले असतात. त्यात लोह, फॉलिक ॲसिड, ओमेगा-३ यांसारखे घटक असतात, जे तुमचे लक्ष दिवसभर एखाद्या विषयावर केंद्रित करायला मदत करतात. त्यामुळे टिफिनसाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे.