TVS ने आपली Apache RTR 160 ही लोकप्रिय बाइक BS6 इंजिनसह लाँच केली आहे. BS6 इंजिन असलेल्या TVS Apache RTR 160 बाइकमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम दिली असून या सिस्टिमला ‘रेस ट्यून्ड-FI/RT-Fi टेक्नॉलॉजी’ असं नाव दिलंय. कोणत्याही पोझिशनमध्ये राइड करताना रेसिंगचा दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. बाइकमध्ये लो-स्पीड अर्बन रायडिंगसाठी ‘ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी’ दिली आहे. यामुळे ‘स्मूथ’ आणि ‘कंट्रोल्ड’ राइडचा अनुभव मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. BS4 व्हर्जनच्या तुलनेत BS6 इंजिन असलेली Apache RTR 160 बाइक थोडी अधिक पावरफुल आहे. BS6 मॉडेलमध्ये 159.7cc, टू-वॉल्व, सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 15.5bhp ऊर्जा आणि 13.9Nm टॉर्क निर्माण करते. बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देखील आहे.
नव्या बॉडी ग्राफिक्समुळे स्पोर्टी लुक –
नव्या बाइकमध्ये नवीन बॉडी ग्राफिक्स दिले आहेत, यामुळे गाडी अधिक स्पोर्टी दिसते. जुन्या मॉडेलप्रमाणे नवीन व्हेरिअंटमध्येही मॅट ब्लू, टी ग्रे, पर्ल व्हाइट, मॅट रेड, ग्लॉस रेड आणि ग्लॉस ब्लॅक या रंगांचा पर्याय आहे. नव्या TVS Apache RTR 160 मध्ये फ्रंट व्हीलला डिस्क ब्रेक दिलेत, तर रिअर व्हीलला डिस्क/ड्रम ब्रेक आहे. तसेच ब्रेकिंगवेळी स्किड होण्यापासून बचावासाठी सिंगल-चॅनल ABS आहे. याशिवाय बाइकच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये मोनो-शॉक युनिट आहे.याशिवाय बाइकमध्ये अन्य काहीही बदल करण्यात आलेला नाही.
किंमत (एक्स-शोरुम) –
या बाइकच्या रिअर ड्रम व्हेरिअंटची किंमत 93 हजार 500 रुपये , तर रिअर डिस्क व्हेरिअंटची किंमत 96 हजार 500 रुपये आहे. BS4मॉडेलच्या तुलनेत BS6 मॉडेल जवळपास सहा हजार रुपयांनी महाग आहे.