करदात्याला त्याचे आयकर रिटर्न (ITR) मूल्यांकन वर्षात फक्त एकदाच अपडेट करण्याची परवानगी असेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी बुधवारी ही माहिती दिली.


कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) द्वारे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना महापात्रा म्हणाले की, “या तरतुदीचा उद्देश अशा लोकांना संधी देणे आहे जे कोणत्याही वैध कारणामुळे ITR अपडेट करू शकले नाहीत. अशा करदात्यांना मूल्यमापन वर्षात फक्त एकदाच आयटीआर भरता येईल.”

आणखी वाचा : Beauty Care Tips : कच्च्या दुधाने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात का? जाणून घ्या

२०२२-२३ च्या अर्थसंकल्पाने करदात्यांना आयटीआर दाखल केल्याच्या दोन वर्षांच्या आत ‘अपडेट’ करण्याची परवानगी दिली आहे, ज्याने रिटर्नमध्ये काही चूक केली आहे किंवा कोणतेही तपशील वगळले आहेत. अशा वेळी करदाते कर भरून आयटीआर अपडेट करू शकतील.

आयटीआर १२ महिन्यांच्या आत दाखल केल्यास देय कर आणि व्याजावर अतिरिक्त २५ टक्के भरावे लागतील, तर १२ महिन्यांनंतर आणि शेवटच्या २४ महिन्यांपूर्वी दाखल केल्यास हा दर ५० टक्क्यांपर्यंत जाईल.

आणखी वाचा : Valentine Week 2022: ‘रोज डे’पासून ‘व्हॅलेंटाइन डे’पर्यंत कोणता दिवस कधी आहे आणि कसा साजरा करतात, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण कोणत्याही मूल्यांकन वर्षासाठी, नोटिसा बजावून खटला चालवण्याची कार्यवाही सुरू केली असल्यास, करदात्याला या सुविधेचा लाभ मिळणार नाही.