कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कढीपत्ता आवर्जून वापरला जातो कारण तो पदार्थाची जव आणखी वाढवतो. कढीपत्ता हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये कढीपत्ता वापरला जातो. कित्येक लोक घरातचं कढीपत्याचे रोप लावतात जेणेकरून केव्हाही गरज पडली की पटकण वापरता येईल. पण बऱ्याचदा नियमित पाणी टाकूनही कढीपत्याची हवी तशी वाढ होत नाही. अनेकदा कढीपत्याच्या रोपाला कीडही लागते. अशावेळी तुम्ही कढीपात्याची चांगली वाढ व्हावी यासाठी खत वापरू शकता.

कढीपत्तासाठी एक विशेष खतं वापलं जात जे त्याच्या चांगल्या वाढीसाठी मदत करते. त्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन पैसे खर्च करून महागडे खत आणण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी हे कढीपत्यासाठी खत तयार करू शकता. कढीपत्याचे खत तयार करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असणारा एक पदार्थ वापरायचा आहे. कोणता आहे तो पदार्थ जो खत म्हणून कढीपत्यासाठी वापरू शकता? जाणून घेऊ या

कढीपत्यासाठी सर्वात चांगले खत म्हणजे घरात तयार होणारे ताक किंवा आंबट दही असते. जे दही तीन -चार दिवसापूर्वीचे झाले आहे ते वापरून तुम्ही कढीपत्यासाठी खत म्हणून वापरू शकता. हे खत वापरल्याने कढीपत्याची वाढ झटपट होते आणि त्याला किड देखील लागत नाही.

हेही वाचा – तुमच्या जीन्सचा काळा रंग फिका पडलाय का? मग ‘ही’ सोपी ट्रिक वापरा अन् घरच्या घरी द्या रंग

हेही वाच – कढीपत्ता- चरबी कमी करणारे सुपरफूड; वजन कमी करण्यासाठी कसे ठरते फायदेशीर? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताक किंवा आंबट दही वापरून कढीपत्याचे खत कसे तयार शकता?

एका बादलीत दोन-तीन दिवसापूर्वीचे थोडेसे दही घ्या.
त्यातच दोन-चार मग भरून पाणी ओता आणि एकत्र करा.
खुरपेवारून कडीपत्याच्या कुंडीतील रोपाच्या आसपासची माती मोकळी करा जेणेकरून मुळापर्यंत खत पोहचेल.
तयार मिश्रणाचा एक मग या रोपाला टाका.
कढीपत्याच्या रोपाची चांगली वाढ होईल.
तसेच हे पाणी गाळून घेऊन स्प्रेच्या बाटलीमध्ये टाकून घ्या.
त्यानंतर कढीपत्त्यावर स्प्रे करा जेणेकरून त्याला कोणीतीही कीड लागणार नाही.