रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक वेळा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते. पण अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा रिफंड मिळू शकतो. भारतीय रेल्वेने सांगितले की, चार्ट तयार झाल्यानंतर तुम्ही काही कारणास्तव ट्रेनचे तिकीट रद्द केले तरीही तुम्ही रिफंडसाठी क्लेम करू शकता.

आयआरसीटीसीची (IRCTC) मोठी माहिती

आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि म्हटलंय , जर प्रवाशांनी प्रवास न करता तिकीट रद्द केल्यास भारतीय रेल्वे परतावा देते. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट जमा पावती जमा करावी लागेल.

ऑनलाइन टीडीआर कसा दाखल करावा

  • यासाठी तुम्ही प्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जा .
  • आता होम पेजवर जाऊन माय अकाऊंट वर क्लिक करा
  • आता ड्रॉप डाउन मेनूवर जाऊन माय ट्रानजंक्शन वर क्लिक करा.
  • येथे तुम्ही फाइल टीडीआर पर्यायातील एक पर्याय निवडून फाइल टीडीआर करू शकता.
  • आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.
  • आता येथे तुम्ही तुमचा पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.
  • आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक ओटीपी मिळेल.
  • ओटीपी टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर तपशीलाची पडताळणी करा आणि तिकीट रद्द करा पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला पृष्ठावर रिफंडची रक्कम दिसेल.
  • बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला पीएनआर आणि रिफंडचे तपशील असलेला एक पुष्टीकरण संदेश मिळेल.