Kitchen Hacks : तळलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसले तरी तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. तळलेल्या पदार्थांमुळे वजन वाढते आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढते. याच कारणामुळे अनेक लोक तळलेले पदार्थ खाणे टाळतात. पण, तुम्हाला तळलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर टेन्शन घेऊ नका.
सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी पदार्थ तेलात तळताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी खास टिप्स सांगितल्या आहेत. आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या.

ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या साबुदाणा वडा तळताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी तेलात पदार्थ तळताना प्रत्येकाला माहिती असावेत असे पाच नियम सांगितले.

हेही वाचा : Period Pain : मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; न्युट्रिशनिस्टनी सांगितल्या खास टिप्स….

.त्या सांगतात, “१. नेहमी लहान बर्नरचा वापर करावा. २. ज्या कढईमध्ये पदार्थ तळणार आहात, ती कढई कोरडी असावी. ३. तेल गरम झाल्यानंतरच त्यात पदार्थ टाकावा. तेल गरम झाले की नाही हे तपासण्यासाठी तेलात पदार्थाचा एखादा छोटा तुकडा टाकावा. त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल. ४. तुम्हाला जो पदार्थ तळायचा आहे, तो कढईत कडेने टाका. त्यामुळे तेल अंगावर उडणार नाही. ६. नेहमी मंद आचेवर पदार्थ तळा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rujuta.diwekar या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या खास टिप्स दिल्याबद्दल ऋजुता यांचे आभार मानले आहेत.
ऋजुता यांचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. ऋजुता या नेहमी इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित व्हिडीओ शेअर करीत असतात आणि नवनवीन माहिती युजर्सना देत असतात.