Period Pain Relieving Foods : अनेक महिलांना मासिक पाळीत खूप वेदना होतात. सहसा ओटीपोटात होणाऱ्या वेदना खूप त्रासदायक आणि असहनीय असतात. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही होतो. या वेदनांमुळेच स्त्रियांचा मूडसुद्धा वारंवार बदलत असतो. अनेकदा त्या मासिक पाळीदरम्यान खूप चिडचिड करतात.
मासिक पाळीमध्ये वेदना होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये न्युट्रिशनिस्ट दिशी सेठीने मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही खास पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.
डार्क चॉकलेट
जर तुम्हाला चॉकलेट आवडत असेल, तर मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमची मात्रा अधिक असते: ज्यामुळे स्नायूंचे दुखणे आणि वेदना कमी होतात.
आले
आले हे औषधी गुणधर्माने समृद्ध आहे. याचे अनेक फायदे तुम्ही वाचले किंवा ऐकले असाल पण तुम्हाला माहिती आहे का मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यास आले अत्यंत फायदेशीर आहेत.
हेही वाचा : बदाम खा आणि झटपट वजन कमी करा; जाणून घ्या बदाम खाण्याचे आणखी फायदे
हिरवा भाजीपाला
मासिक पाळीदरम्यान शरीराला महत्त्वाची पोषक तत्त्वे गरजेची असतात; जी आपल्याला हिरव्या भाजीपाल्यातून मिळू शकतात. त्यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वेदना कमी करतात. मासिक पाळीदरम्यान ब्रोकोली आणि पालक आवर्जून खा.
जवस
जवसामध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते; जे अँटी इंफ्लेमेटरी एजंट म्हणून काम करते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होतो.
गरम पाणी
ग्रीन टी किंवा गरम पाणी स्नायूंचा थकवा घालवण्यास मदत करते. गरम पाणी प्यायल्यामुळे मासिक पाळीदरम्यानच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)