महान रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आचार्य चाणक्य हे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली होती, जी आजच्या काळातही प्रासंगिक मानली जाते. आचार्य चाणक्यजींनी या धोरणात जीवनाशी संबंधित जवळजवळ सर्व पैलूंवर धोरणं सांगितली आहेत. जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांनी अनेक धोरणं दिली आहेत. आचार्य चाणक्य यांनी पैसे खर्च करण्यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यजी सांगतात की, व्यक्तीने ठराविक ठिकाणी पैसे खर्च करणं कधीही टाळू नये, कारण या ठिकाणी पैसे खर्च करण्यास संकोच केल्यास नंतर पश्चाताप करावा लागू शकतो.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
ग्रामविकासाची कहाणी

आजारी लोकांना मदत करणे: आचार्य चाणक्य सांगतात की गरीब आजारी लोकांना मदत करण्यासाठी, शक्य तितके पैसे खर्च केले पाहिजेत. कारण आजारी माणसांना मदत केली नाही तर काही वाईट घडल्यावर माणसाला पश्चाताप करावा लागतो. असं केल्याने देव तर प्रसन्न होतोच, पण समाजात तुमचा मानही वाढतो.

गरजूंना मदत करणे: लोकांनी नेहमी गरीब आणि गरजूंना मदत केली पाहिजे. कारण चाणक्य जी सांगतात की, गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी पैसा खर्च केल्याने पुण्य मिळतं. तुम्ही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू शकता, यासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग दान करू शकता. असं केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होतो.

सामाजिक कार्य : व्यक्ती जे काही कमावते ते समाजकार्यात गुंतवले पाहिजे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तुमच्या कमाईचा काही भाग हॉस्पिटल आणि शाळा इत्यादींना दान करू शकता. सामाजिक कार्य केल्याने भाग्य वाढतं. यासोबतच तुम्हाला समाजातही खूप प्रशंसा मिळते.

धार्मिक स्थळांना दान करा: आचार्य चाणक्यजी मानतात की, धार्मिक स्थळांवर दान केल्याने जीवनात सकारात्मकता येते. यामुळे तुमचे जीवन आनंदी राहतेच शिवाय तुमच्या कुटुंबात शांती, आनंद आणि समृद्धी वाढते.