पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील एका मुलीने एक स्वस्त आणि पोषक असे पेय तयार केले आहे. या मुलीचे नाव देबाद्रिता मंडल असे आहे. अवघ्या पंधरा वर्षांच्या या मुलीने तयार केलेल्या या आरोग्यवर्धक पेयाला वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) या वर्षीचा अभिनवता पुरस्कार दिला आहे.
बोंगाबारी या भागातील आठवीत शिकणाऱ्या या मुलीने हे पेय का तयार केले तर त्याची कथा वेगळी आहे. आदिवासी भागातील एका गरीब महिलेने या मुलीला विचारले की, माझ्या बाळाला कुपोषणापासून वाचवायला तू काय करू शकशील, तिने या प्रश्नाचे उत्तर लगेच दिले नाही तर कृतीतूनच उत्तर दिले. जिल्हाधिकारी तन्मय चक्रवर्ती यांनीही या मुलीच्या संशोधनाचे कौतुक केले. पण आता या पेयात काय आहे हे लपवून ठेवायला तो काही कोकाकोलाचा फॉम्र्युला नाही, या पेयात गहू, कोरडे दूध, साखर व सोयाबीन यांचा वापर केलेला आहे, असे ती सांगते. तिने या पेयावरचा शोधनिबंध सीएसआयआरकडे पाठवून दिला व तिचा तो शोधनिबंध स्वीकारला गेला अन् त्याला पारितोषिकही मिळाले.
मुलेही त्यांच्या प्रज्ञेचा उपयोग हा असा समाजासाठी करू शकतात, त्याचे हे बोलके उदाहरण. दहावीत शिकणाऱ्या या मुलीला या पेयासाठी एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्याकडेही मेळघाट व इतरही काही भागांमध्ये कुपोषण आहे तिथे असे पेय उपलब्ध करून दिल्यास या समस्येवर मात करता येईल.
पेयाचे नाव -होमलिकस
घटक (५०० ग्रॅमला)
*गहू पीठ-१०० ग्रॅम
*बार्ली पीठ २०० ग्रॅम
*दुधाची पावडर- ८० ग्रॅम
*साखर पावडर- १०० ग्रॅम
*सोयाबीन पावडर – २ चमचे
(किंमत ३५ रूपये २० पैसे)
(कोको मिसळल्या किंमत ५२ रू. २० पैसे)
पेय जास्त काळ टिकण्यासाठी त्यात तुळशीची कोरडी पाने टाकून ठेवावीत
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
स्वस्त आणि पोषक आरोग्यदायी पेय
आदिवासी भागातील एका गरीब महिलेने या मुलीला विचारले की, माझ्या बाळाला कुपोषणापासून वाचवायला तू काय करू शकशील, तिने या प्रश्नाचे उत्तर लगेच

First published on: 18-01-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheap and healthy drink