Cheese Toast Recipes : ब्रेडबरोबर चीज खायला अनेकांना आवडते. तर काहीजण अनेक पदार्थांमध्ये चीजचा वापर करतात. मग तो पिझ्झा असो मॅगी असो वा, सँडविच. बरेच लोक भूक लागल्यानंतर नुसतं ब्रेडबरोबर चीज खातात. यात ब्रेकफास्टमध्ये रोज तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल आणि नवीन रेसिपी ट्राय करायची असेल, तर चीज टोस्ट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चीज आणि ब्रेडपासून तयार होणारा हा पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे बनवू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी असे काही पदार्थ आणले आहेत, जे तुम्ही घरी सहज बनवू शकता. हे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धतही अगदी सोप्पी आहे. चला तर मग ५ रेसिपीजबद्दल जाणून घेऊ…
१) चीझी गार्लिक टोस्ट
ही क्लासिक डिश अनेकांची आवडती आहे, जी बनवण्यासाठी खूप कमी पदार्थांची गरज भासते. चीज आणि लसूण यांचे कॉम्बिनेशन असलेली ही डिश तुमची खाण्याची इच्छा पूर्ण करण्याचा एक सोपा आणि स्वादिष्ट मार्ग आहे. तुम्ही सूप आणि सॅलडसोबतही ही डिश खाऊ शकता.
२) चिली चीज टोस्ट
चीज आणि ब्रेडपासून बनवलेली आणखी एक लोकप्रिय डिश आहे, जी जगभरातील लाखो लोकांना आवडते. मसालेदार आणि चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम स्नॅक्स आहे. कॅफे स्टाइल चिली चीज टोस्ट तुम्ही घरी देखील सहज बनवू शकता.
३) मसाला चीज टोस्ट
चीज टोस्टच्या या डिशला तुम्ही देसी ट्विस्ट देऊ शकता. मसाला चीज टोस्टमध्ये तुम्ही काही चिरलेल्या भाज्या आणि मसाले टॉपिंगसाठी वापरु शकता. हे टॉपिंग पदार्थाला कुरकुरीत तसेच स्वादिष्ट बनवते.
४) चीज पिझ्झा टोस्ट
तुम्हाला घरी असताना पिझ्झा खाण्याची इच्छा होते परंतु तुमच्याकडे पिझ्झा बेस नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही नेहमीच्या ब्रेडच्या मदतीने पिझ्झा बनवू शकता. चीझी पिझ्झा टोस्ट तुमच्या रात्रीची भूक, संध्याकाळचा चहा किंवा कोणत्याही पार्टीसाठी एक बेस्ट स्नॅक्स असू शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टॉपिंग्ज आणि सीझनिंग्जसह हा चीन पिझ्झा तयार करू शकता.
५) मसाला चीज फ्रेंच टोस्ट
जर तुम्हाला नियमित मसाला चीज फ्रेचे टोस्ट खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी तुम्ही मसाला चीज फ्रेच टोस्ट ट्राय करुन शकता. चीज आणि मसाले वापरुन तुम्ही हा पदार्थ अधिक चवदार बनवू शकता आणि तुम्ही अतिरिक्त चीज वापरुन चव अनेक पटींनी वाढवू शकता.