scorecardresearch

Premium

Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त घरी तयार करा ‘हे’ पदार्थ; सगळे जण होतील खुश

Raksha Bandhan Latest News: यंदा संपूर्ण भारतात ३० ऑगस्ट हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

Raksha Bandhan 2023 News
रक्षा बंधन २०२३ (फोटो -लोकसत्ता)

Raksha Bandhan Marathi News: यंदा संपूर्ण भारतात ३० ऑगस्ट हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील हा आनंदाचा दिवस असतो. रक्षाबंधन सणाची तयारी ही काही दिवस आधीपासूनच सुरू होते. जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. भाऊ-बहिणीचे हे पवित्र आणि खास नाते साजरे करण्यासाठीच दरवर्षी रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात. भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम आणि आपुलकी रोज पाहायला मिळते. भाऊ-बहीण एकमेकांशी कितीही भांडत असले तरी दोघांमधील परस्पर प्रेम कधीच कमी होत नाही. भाऊ मोठा असो किंवा लहान, तो बहिणीला प्रत्येक सुख देण्याचा आणि तिला प्रत्येक दुःखापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 

रक्षाबंधन सणाचा दिवस खास बनवण्यासाठी प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यादिवशी सर्व कुटुंब एकत्रितपणे हा सण साजरा करते. मिठाई, तसेच अन्य पदार्थ या दिवशी तयार केले जातात. आज आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत जे या दिवशी घरी तयार केले गेले तर प्रत्येकजण आनंदी होईल.

Teacher Recruitment
शिक्षक भरती : दलाल, मध्यस्थ सक्रिय; ‘ही’ घ्या काळजी…
Bank of Baroda Bharti 2024 announced new recruitment notifications for various posts Know More Details
BOB Bharti 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ‘या’ विविध पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जातील सर्व तपशील
haldwani
नझूल जमिनीवरील अवैध बांधकामामुळे उत्तराखंडमध्ये हिंसाचार, पण ‘नझूल जमीन’ म्हणजे काय? वाचा सविस्तर…
nagpur crime news, nagpur young man shot dead marathi news
खळबळजनक! दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: लाडक्या बहिणीला स्मार्टवॉचसह भेट द्या ‘ही’ युनिक गिफ्ट्स, एकदा पाहाच

छोले भटुरे

छोले-भटुरे आपल्यापैकी अनेकांची आवडती डिश असेल. ऋतू कोणताही असो, छोले-भटुरे आवडीने खाल्ले जातात. छोले भटुरे ही एक असा पदार्थ आहे. जो सर्वाना खायला आवडतो. छोले भटुरे तयार करणे खूप सोपे आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही सर्वांसाठी छोले भटुरे तयार करू शकता. त्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदित होतील.

पास्ता आणि पिझ्झा

पिझ्झा, बर्गर ही पाश्चिमात्य खाद्य संस्कृती भारतीयांच्या केवळ अंगवळणीच पडली नाही तर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेच जागोजागी खवय्यांना आकर्षित करणारे पिझ्झाचे आऊटलेट दिसून येतात. पिझ्झाप्रमाणेच ग्राहकांना पास्ता अधिक आवडतो. त्यामुळे चोखंदळ ग्राहक पास्ताच्या शोधात असतात. जर का तुमच्या भावाला पास्ता किंवा पिझ्झा आवडत असेल तर तुम्ही त्या दिवशी हे पदार्थ तयार करू शकता. त्यामुळे तुमच्या घरातील मुलेदेखील आनंदी होतील.

पनीर टिक्का

पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते.  पनीर टिक्का भाजी पोळी, रोटी,नान, कुलचा, जीरा राईस सोबत छान लागते. रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या घरी बरेच पाहुणे आले तर तुम्ही स्नॅक्ससाठी पनीर टिक्का तयार करू शकता. तुम्ही पनीर टिक्का पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह करू शकता.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी घरच्या घरी तयार करा ‘या’ मिठाई

व्हेजिटेबल पुलाव किंवा बिर्याणी

जर का तुमच्या कुटुंबासाठी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त व्हेजिटेबल बिर्याणी किंवा पुलाव देखील तयार करू शकता. तसेच तुम्ही या दिवशी फ्रुट सॅलॅड, ढोकळा, पाणीपुरी असे अन्य पदार्थ देखील या दिवशी तयार करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chole bhature panipuri pizza and pasta recipe for rakshabandhan 2023 festival tmb 01

First published on: 28-08-2023 at 18:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×