नवी दिल्ली : हिवाळय़ाला सुरुवात झाली की, बहुसंख्य पुरुषांच्या वर्तनात बदल दिसून येतो. ते तणावात असतात. तसेच  ते छोटय़ा- छोटय़ा गोष्टींवरून चिडचिडही करतात. थंडीचा कडाका वाढत गेल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा वाढतो.

पुरुषांच्या या स्वभाव बदलाची नोंद वैद्यकीय तज्ज्ञांनीही घेतली असून त्यांच्या म्हणण्यानुसार थंडीच्या आगमनानंतर ‘सीजनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर’चा (सीएडी) परिणाम पुरुषांमध्ये दिसू लागतो. ‘सीएडी’चा संबंध हा ‘डे लाइट’ अर्थात दिवसाच्या प्रकाशाबरोबर आहे. हिवाळय़ात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो. त्याचा थेट परिणाम मानसिकदृष्टय़ा पुरुषांवर पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रोध वाढवणारे रसायन : मेंदूत सेरोटोनिन हे रसायन असते. ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करते. सेरोटोनिन हे केवळ माणसाचे वर्तन नियंत्रणाचेच काम न करता ते पचनही सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण हे सुर्यप्रकाशातून मिळणाऱ्या डी जीवनसत्त्वाच्या प्रमाणानुसार ठरते. सेरोटोनिनची मात्रा कमी झाल्यास चिडचिड आणि तणाव वाढतो. त्यामुळेच  सूर्यप्रकाश आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.