आरोग्य चांगले राहण्यामध्ये आहाराची अतिश महत्त्वाची भूमिका असते. यातही काही पदार्थ कच्चे खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. आहारतज्ज्ञही अनेकदा सॅलेड, कच्ची कडधान्ये यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करायला सांगतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. मात्र, काही भाज्या किंवा कडधान्ये शिजवल्यानंतर त्यामधील पोषक घटक नाहीसे होतात. कच्चे पदार्थ खाणे हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतात.

कच्चे पदार्थ म्हणजे नेमके काय?

कच्च्या पदार्थांमुळे शरीराचे चांगले पोषण होते. कच्च्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. असे असले तरीही हे पदार्थ चांगल्या पद्धतीने पचणेही तितकेच आवश्यक असते. आता कच्चे पदार्थ म्हणजे काय तर फळे, कच्च्या भाज्या आणि मोड आलेली कडधान्ये इ.

आरोग्याला नेमका काय उपयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण कोणताही पदार्थ शिजवतो तेव्हा त्यातील व्हिटॅमिन्स, खनिजे यांसारखे पौष्टीक घटक निघून जातात. त्यामुळे काही पदार्थ कच्चे खाणे जास्त फायदेशीर असते. अनेकदा आपल्याला अॅसिडीटी किंवा जळजळ होण्याचा त्रास होतो. मात्र, कच्चे अन्नपदार्थ खाल्ल्याने हा त्रास होण्यापासून आपली सुटका होते. रक्तदाब, हाडांचे दुखणे, लठ्ठपणा, हार्मोन्सचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी कच्चे पदार्थ उपयुक्त असतात.