World Milk Day 2023: शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी लहान मुलांना दूध पिण्याची सवय लावली जाते. दुधामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम असे विविध पोषक घटक असतात. शरीराच्या वृद्धीसाठी दुधाची खूप मदत होते. आपल्याला लहानपणापासून दुधाच्या फायद्याविषयी सांगितलं जातं. आपल्याकडून गाई, म्हशी अशा प्राण्यांपासून मिळणारं दूध वापरलं जातं. काही जण गाईपासून मिळलेल्या दुधाचे सेवन करत असतात. तर काहींना म्हशीच्या दुधाची सवय असते; तर काही लोक दोन्ही प्रकारांतील दुधाचा वापर करत असतात. यामुळे अनेकांना गाईचं दूध जास्त आरोग्यदायी असतं की, म्हशीचं.. असा प्रश्न पडत असतो.

गाईचे दूध Vs म्हशीचे दूध

गाईच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा कमी प्रमाणात फॅट्स असतात. त्यामुळे ते पचण्यासाठी हलकं असतं असं म्हटलं जातं. गाईचं दूध हे म्हशीच्या दुधाच्या तुलनेमध्ये जास्त घट्ट आणि मलईदार असतं. यामुळे गाईच्या दुधापासून दही, पनीर, खीर, तूप असे दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात. तसेच रसगुल्ला, रसमलाई यांसारखे मिठाईचे पदार्थ तयार करता येतात.

bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधापेक्षा ११ टक्के जास्त प्रोटीन्स असतात. म्हशीच्या दुधात lipids नावाचं प्रोटीन असतं. या प्रोटीनमुळे नवजात मुलांना हे दूध पचायला त्रास होतो. म्हशीच्या दुधाच्या तुलनेमध्ये गाईच्या दुधामध्ये कमी फॅट्स असतात. यामुळे गाईचं दूध पातळ असतं. त्यातील फॅट्सचं प्रमाण हे ७-८ टक्के असतं. याउलट म्हशीच्या दुधात ३-४ टक्के फॅट्स असतात. सोप्या शब्दात गाईचं दूध पचायला फारसा त्रास होत नाही. परिणामी एका वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लहान बाळांना गाईचं दूध पाजलं जातं.

लहान मुलांना एका दिवसामध्ये किती वेळा दूध पाजणं योग्य असतं?

नवजात बालकांसाठी दररोज दोन किंवा तीन कप दूध पिणं योग्य असतं. बाळ दुधाव्यतिरिक्त इतर गोष्टींचं सेवन करत नाही, ते फक्त दुधावर अवलंबून असतं.

आणखी वाचा – World Milk Day 2023: नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या सविस्तर

दुधाचा कोणता प्रकार जास्त आरोग्यदायी आहे?

लहान बाळांच्या शारीरिक रचनेचा विचार करता गाईचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा जास्त उत्तम पर्याय मानला जातो. म्हशीच्या दुधात फॅट्स असल्याने ते पचायला वेळ लागू शकतो. शिवाय त्याने बाळाच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांचं वय वाढल्यावर तुम्ही त्यांना म्हशीचं दूध प्यायला देऊ शकता. म्हशीच्या दुधात फॅट्ससह, प्रोटीन्स, कॅल्शियम, कॅलरी हे घटक जास्त प्रमाणात असतात.