आपल्या हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती आपल्या उत्साही आणि उदंड आयुष्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे ती जास्तीत जास्त वाढवणे आपल्या हातात पर्यायाने आहारात असते. दिसायला छोटय़ा पण त्याहीपेक्षा कैक पटीने अधिक गुणधर्मानी परिपूर्ण असणाऱ्या ‘क्रॅनबेरीज’ म्हणजे हृदयासाठी वरदान.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतल्या टफ्ट विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार ‘क्रॅनबेरीज’ हे छोटे व लाल भडक रंगाचे फळ खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारतेच, पण तुमची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. बेरी म्हणजेच छोटय़ा गटातल्या फळांच्या यादीत ‘क्रॅनबेरीज’ हे फळ आरोग्यासाठी सर्वाधिक ऊर्जावर्धक आहे. इतकेच नव्हे तर हे फळ पित्तशामक व चयापचय क्रिया सुधारणारे आहे. याशिवाय शरीरातीतल स्निग्धता आणि कबरेदकांमध्ये समन्वय साधण्याचे कामही हे फळ करते. फक्त हृदयरोगासाठी याचे कार्य मर्यादित नसून सुकवलेली ‘क्रॅनबेरीज’ मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत करते. असे हे लहान मूर्ती असलेले पण महान कीर्ती असलेले ‘क्रॅनबेरीज’.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cranberry juice fights heart disease
First published on: 22-07-2016 at 01:20 IST