International Dance Day 2022, 29 April : जर तुम्ही जास्त वजन उचलत नसाल आणि जास्त व्यायाम करत नसाल तर डान्स हा सर्वोत्तम आणि सर्वात मजेदार फिटनेस व्यायाम आहे. शारीरिकदृष्ट्या उपयुक्त असण्यासोबतच, मानसिक आरोग्यासाठी डान्सचे अनेक फायदे आहेत. डान्स केल्याने लगेच मूड सुधारतो आणि ही एक उत्तम आरामदायी अ‍ॅक्टिव्हिटी आहे. ही कला साजरी करण्यासाठी दरवर्षी २९ एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिना’च्या निमित्ताने, डान्स ही मजेशीर अ‍ॅक्टिव्हिटी तुम्हाला निरोगी आणि मानसिकदृष्ट्या कसे स्थिर बनवू शकते हे जाणून घेऊया.

  • तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की डान्स हा कार्डिओ वर्कआउटचा एक उत्तम प्रकार आहे, हे व्यर्थ सांगितले गेले नाही. नियमितपणे डान्स केल्याने हृदय गती संतुलित होते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.

कसा करावा एकटेपणाचा सामना? ‘हे’ ४ उपाय करून दूर करा मनातील सर्व दुःख

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
chandrapur forest employee suspend,
‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे स्टेटस; वनकर्मचारी निलंबित
President Draupadi Murmu Standing While Giving Bharatratna Award To Lalkrishna Advani
लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळताना मोदींकडून नियमभंग? लोक म्हणतात, “शिस्त- शिक्षणाचा..”
long distance marriage marathi news, long distance marriage tips
समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?
  • असे मानले जाते की जे लोक आठवड्यातून ३ ते ४ वेळा अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ डान्स करतात त्यांचा स्टॅमिना आणि श्वासोच्छ्वास चांगला असतो त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
  • झुंबा, एरोबिक्स आणि साल्सा हे सर्व डान्सचे आणि व्यायामाचे प्रकार आहेत. डान्समध्ये जड हालचालींचा समावेश होतो आणि त्यामुळे घाम येतो, ज्यामुळे वजन कमी होते.
  • जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुम्ही तुमचे आवडते संगीत लावून त्यावर डान्स करा. हे तुम्हाला आराम करण्यास मदत करेल, तुम्हाला तणावातून थोडा आराम मिळेल आणि काही काळासाठी तुमचा ताण विसरून जाल.