डार्क चॉकलेट खा, आजार टाळा!

आठवड्यातून दोन ते तीन वेळा थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

नुकत्याच झालेल्या संशोधनातून ‘डार्क चॉकलेट’ आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहे, असे सिद्ध झाले आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसेच डार्क चॉकलेटमुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. डार्क चॉकलेटमुळे रक्तातील गुठळ्यांची समस्याही दूर होते. तसेच धमनी काठिण्यापासूनही आपले शरीर सुरक्षित राहते. डार्क चॉकलेट मेंदू तसेच ह्रद्यातील रक्तप्रवाह वाढवते. त्यामुळे शरीराला ह्रद्य आणि मेंदू यांतील समतोल राखण्यास मदत होते. ह्रद्यविकाराच्या झटक्याची क्षमताही कमी होते. डार्क चॉकलेटमधील काही रासायनिक घटकांमुळे आपला मूड ताजातवाना राहण्यासाठी मदत होते.
रक्तवाहिन्यांना निरोगी ठेऊन त्यातील रक्त प्रवाह सुरळीत राहिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाणाची पातळी योग्य राहते. डार्क चॉकलेटमधील फ्लॅओनॉईडस् शरीरातील इन्सुलिनची पातळी योग्य ठेवते. डार्क चॉकलेटमध्ये अँन्टीऑक्सिडस मोठ्या प्रमाणात असतात. त्यातील रॅडीक्लस चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्यास प्रबंध करते. तसेच डार्क चॉकलेटचा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे कर्करोग होण्यापासून आपल्या शरीराचा बचाव करते. थेओब्रोमाईन हा चॉकलेटमधील एक महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. कोकोच्या बियांपासून हा रासायनिक घटक मिळतो. हा रासायनिक घटक दातांना किडण्यापासून वाचवतो. तसेच थेओब्रोमाईन हे कफ आणि सर्दीसाठीही गुणकारी असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dark chocolate is good for health

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या