Deep Amavasya 2025 Wishes: आषाढ महिन्याच्या दीप अमावास्येचे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या अमावास्येला दर्श अमावास्यादेखील म्हटले जाते. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असून, या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीची आणि कल्याणाची प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी घरातील मुलांनाही ओवाळले जाते. २४ जुलै रोजी दीप अमावास्या आहे. यंदा दीप अमावास्येनिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून, त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.
दीप अमावास्येच्या शुभेच्छा
१) अहंकाराचा अंधार पळून जावो
दिव्याच्या तेजाने सद्वविचार वाढो
तुम्हा सर्वांना धन-संपत्ती अन् चांगले आरोग्य प्राप्त होवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

२) दीवा अन् वातीचे नाते अनोखे
जन्मोजन्मी साथ देणारे,
अंधाराला दूर करूनी
जगाला प्रकाशाने उजळणारे
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
३)दिव्याच्या तेजस्वी प्रकाशाने
उजळतील दाही दिशा
सुखाची उमेद जागवेल
दर्श दीप अमावास्या
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
४)चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
यासारखी फुलत जावी आपली नाती!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

५)तमाकडून तेजाकडे नेणाऱ्या दीपत्काराला,
प्रकाशाच्या धारकाला दिव्यांच्या तेजोमय
चैतन्याला नमस्कार असो
दीप अमावास्येच्या हार्दिक

६)दिव्याच्या मंगलमय प्रकाशाने,
तुमच्या कुटुंबात सदा सौभाग्य अन् ऐश्वर्य नांदो!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!