शाओमी आणि असूस या फोनचे बाजाराचे आगमन झाल्याने सॅमसंग या एकेकाळी आघाडीवर असलेल्या कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला. याआधी ही कंपनी बजेटमधील स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध होती. आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीने नुकताच आपला एक नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy J6 असून त्यात अतिशय चांगली फिचर्स देण्यात आली आहेत. डिझाईनच्या बाबतीत कंपनीने नवीन प्रयोग केला असून या फोनची किंमतही १३,९९० रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोनला इन्फीनीटी डिस्प्ले दिला असून सॅमसंगने आपल्या इतर फोनप्रमाणेच यामध्ये कर्व्ह ग्लासचा वापर करण्यात आला आहे. या फोनचा ब्राईटनेस अतिशय चांगला आहे. या फोनला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये डिस्प्लेच्या खाली कोणतेही बटण देण्यात आलेले नाही. होम, बॅक आणि ओव्हरव्ह्यू ही बटणे स्क्रीनवरच देण्यात आली आहेत. फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण देण्यात आले आहे. तसेच स्पीकरसाठीही जागा ठेवली आहे. डाव्या बाजूला आवाज कमी जास्त करण्यासाठी बटण देण्यात आले आहे. नॅनो सिमकार्डसाठी दोन स्लॉट तसेच मेमरी कार्डसाठी एक स्लॉट देण्यात आला आहे.

यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. मात्र हा जास्त रॅमचा वेरियंट आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही. अँड्रॉईड ८.० ओरीयो या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. ३ जीबी रॅम असणाऱ्या फोनमध्ये ३ हजार मेगापिक्सलची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ऑनलाईन खरेदी केल्यास त्यावर कॅशबॅकसारख्या ऑफर्स मिळत आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Details of samsung galaxy j6 features and price
First published on: 14-06-2018 at 16:44 IST