२०१२ मध्ये जगभरातील आठ लाख जणांना कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामागे मधुमेह आणि लठ्ठपणा हेच प्रमुख कारण असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या ४० टक्के पुरुषांना यकृताचा कर्करोग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाणही असल्याचे संशोधकांनी सांगितले. लठ्ठपणा आणि कर्करोग यांच्यातील संबंध काही वेळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मधुमेह आणि कर्करोगाचा संबंध नुकताच समोर आला आहे, असे ब्रिटनमधील इम्पेरिअल महाविद्यालयातील जोनाथन पिअर्सन-स्टटार्ड यांनी सांगितले.  मधुमेह आणि लठ्ठपणा यामुळे विविध प्रकारे कर्करोगाचा धोका संभवतो. जगभरात ही समस्या भीषण झाल्याचेही या संशोधनाचे प्रमुख पिअर्सन-स्टटार्ड यांनी सांगितले. हे संशोधन नुकतेच ‘द लँकेट डायबेटिक अँड एन्डोक्रिनोलॉजी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. मागील चार दशकांपासून ही परिस्थिती अधिक भीषण झाली असल्याचे या संशोधनात मांडण्यात आले आहे. १९८० ते २००२ या कालावधीत कर्करुग्णांमध्ये आठ लाख जणांची भर पडली. त्यातील लठ्ठपणामुळे कर्करोग झालेल्यांची संख्या ३० टक्के होती. सध्याच्या परिस्थिती पुरुषांमध्ये कर्करोगवाढीचे प्रमाण ३० टक्के, तर महिलांमध्ये हेच प्रमाण २० टक्के असल्याचे संशोधकांनी सांगितले. धूम्रपानामुळेच कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.