scorecardresearch

मधुमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीमध्ये ‘या’ ५ फळांचे करा सेवन, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास होऊ शकते मदत

नवरात्रीमध्ये उपवास ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फळांचा समावेश केला पाहिजे.

मधुमेही रुग्ण उपवास करतात त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन अन्नपदार्थांचे सेवन करावे. (photo credit: freepik)

चैत्र महिन्याच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात अनेक लोकं उपवास करतात. तसेच या दिवसात मधुमेहींना अन्नपदार्थ निवडणे थोडे कठीण होते. नवरात्रीमध्ये उपवास ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फळांचा समावेश केला पाहिजे. नवरात्रीचा उपवास आणि सण आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येद्वारे साजरा केला जातो, दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जेची गरज भागवण्यासाठी गोड पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मधुमेहांच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. जे मधुमेही रुग्ण उपवास करतात त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन अन्नपदार्थांचे सेवन करावे.

मात्र नवरात्रीच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांना योग्य फळ निवडणे थोडे फार कठीण होऊन जाते. अनेक वेळा मधुमेही रुग्णाला कोणती फळे खावीत आणि कोणती फळे मर्यादित प्रमाणात खावी हेच कळत नाही. दिवसभर फळांशी संबंधित कोणत्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवल्यास तुम्ही साखरेवर नियंत्रण ठेवू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात.

संत्र

आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही संत्री खूप फायदेशीर आहे. संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

पेरु

पेरू हा फळ मधुमेह असलेल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) असतो, ज्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पेरू हे मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ आहे.

किवी

नवरात्रीत फळांच्या आहारात किवी हा एक चांगला पर्याय असू शकतो. किवी चवदार असण्यासोबतच जीवनसत्त्वे ए आणि सीने समृद्ध आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त किवी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

पीच

पीच हे फायबरने भरलेले एक उत्तम फळ आहे, संशोधनानुसार, १०० ग्रॅम पीचपैकी १.६ ग्रॅम फायबर असते. पीच हे डोंगरात आढळणारे फळ असून ते उन्हाळ्यात सहज उपलब्ध होते. पीच खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, त्यामुळे साखरेच्या रुग्णाने उपवासात पीच खाणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diabetes patients should consume these 5 fruits in navratri they can be helpful in controlling blood sugar scsm

ताज्या बातम्या