शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवणे हे एक आव्हान असते. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मानल्या जाणाऱ्या अॅपल कंपनीत आपल्याला नोकरी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असते. आता नोकरी म्हटल्यावर त्यासाठी मुलाखत देणे आलेच. पण अॅपलसारख्या नामवंत कंपनीत नोकरी मिळवणे वाटते तितके सोपे नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनी आपल्याकडे नोकरीसाठी येणाऱ्यांना तांत्रिक आणि त्याशिवायचेही अनेक प्रश्न विचारतात. पाहूयात असेच काही प्रश्न जे अॅपलने आपल्या उमेदवारांना विचारले होते.

१. तुमच्याकडे ३ बल्ब असून तुम्ही वरच्या मजल्यावर आहात, त्याचे स्विच खालच्या मजल्यावर आहेत. यातल्या कोणत्या बल्बचा स्विच कोणता हे तुम्हाला माहित नाही. अशावेळी तुम्ही एका झटक्यात कोणत्या बल्बचा स्विच कोणता हे ओळखून वर कसे जाल? कमी वेळात कोणत्या बल्बचा स्विच कोणता हे कसे ओळखाल?

२. या लक्झरी अशा घडाळ्याकडे बघा आणि त्याची निळ्या रंगाची स्क्रीन तुटण्याचे कारण काय असेल ते सांगा.

३. तुम्ही असलेल्या लिफ्टमध्ये कंपनीचा सीईओ आहे तुम्हाला वरच्या मजल्यावर पोहोचायला १ मिनिट आहे. अशावेळी तुम्हाला नोकरीवर घ्यावे म्हणून तुम्ही त्याला काय सांगाल?

४. आपल्याकडे एक गरम कॉफी आणि लहान कपात गार दूध आहे. याठिकाणचे तापमान या दोन्हीच्या मध्ये आहे. या दोन्हीचे कूलेस्ट कॉम्बिनेशन तयार करण्यासाठी तुम्ही कॉफीमध्ये दूध कधी टाकाल? (सुरुवातीला, मधे की एकदम शेवटी)

५. फोनची असेंब्ली तुम्ही कशी पाहाल?

६. वाळवंटी बेटावर अडकले असताना बचाव पथक येईपर्यंत तुम्ही कसे जगाल?

७. तुम्ही एखादे अॅप असाल तर ते कोणते?

८. तुमच्या टेबलवर स्टील, स्टेनलेस स्टील आणि अॅल्युमिनियम असेल तर त्यांना वेगळे होण्यासाठी कसे सांगाल.

९ तुमचे अॅपलचे पहिले उत्पादन काय असेल? त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल?

१०. रॅम म्हणजे काय हे ५ वर्षाच्या मुलाला समजावून सांगा

Story img Loader