Pre Diwali Detox Diet Plan 2023 : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त अनेकांच्या घरी जाणं होतं. मग तेथील मंडळीच्या फराळ घेण्याच्या आग्रहाखातर आपण फराळातील तळलेले, गोड, रुचकर पदार्थ व मिठाईचा आस्वाद घेतो. त्यातही फराळातील एखादा पदार्थ खूप आवडला, तर तो संपेपर्यंत थांबत नाही. सकाळ, संध्याकाळ नाश्त्यामध्ये फराळाचेच पदार्थ खाल्ले जातात. पण, हे तळलेले आणि गोडाच्या पदार्थांचे अतिरेकी सेवन केल्यास अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय वजन वाढण्याचीही भीती असते. पण, तुम्ही दिवाळीआधीच डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करून स्वत:ला फिट ठेवू शकता. याच डिटॉक्स डाएटविषयी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आहारतज्ज्ञ उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांच्या मते, दिवाळीच्या काळात येणाऱ्या आनंदासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी दिवाळीपूर्वी डिटॉक्स डाएट घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला सणासुदीच्या काळात तेलकट, गोड पदार्थ, मिठाई आणि पेय खाण्यासाठी तयार करते. एकंदरीत या डिटॉक्स डाएट प्लॅनमुळे दिवाळीपूर्वी तुमची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुधारते.
दिवाळीपूर्वी तुम्ही डिटॉक्स डाएट फॉलो केल्यास तुम्ही आरोग्यदायी आहाराची निवड करू शकता. तसेच उत्सवादरम्यान तेलकट, गोड पदार्थांचे अतिसेवन कमी करू शकता.
दिवाळीआधी फॉलो करा ‘हा’ डिटॉक्स डाएट प्लॅन Detox Diet Plan Tips)
1) हायड्रेशन
तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून, त्याचे सेवन करा; ज्यामुळे तुम्हाला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होईल.
2) फळे आणि भाज्या
काकडी, टरबूज व पालेभाज्या यांसारख्या उच्च पाण्याचे प्रमाण आणि फायबर असलेल्या विविध फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
3) होल ग्रेन
शरीराला चांगली ऊर्जा देण्यासाठी आणि फायबरसाठी ब्राऊन राइस, क्विनोआ व ओट्स यांसारख्या होल ग्रेनची निवड करा.
4) लीन प्रोटीन्स
स्नायूंचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी आहारात मासे, चिकन, टोफू किंवा कडधान्य यांसारख्या लीन प्रोटीन्स पदार्थांचा समावेश करा.
5) हर्बल टी
नियमित चहा किंवा कॉफीच्या जागी ग्रीन टी, आले किंवा डँडेलियन टी यांसारख्या हर्बल टीचे सेवन करा.
6) नट्स अँड सीड्स
निरोगी फॅट्स आणि प्रोटिन्ससाठी आहारात नट्स अँड सीड्सचा आहारात समावेश करा.
7) प्रोबायोटिक फूड
आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात दही किंवा केफिरचा समावेश करा.
डिटॉक्स डाएट फॉलो करण्यापूर्वी वाचा ‘या’ टिप्स
१) डिटॉक्स डाएटची उद्दिष्टे सेट करा आणि त्यानुसार तुम्ही जेवण आणि नाश्त्याबाबत एक अॅडव्हान्स प्लॅन तयार करा.
२) डिटॉक्स प्रक्रियेला पाठिंबा देण्यासाठी आणि तुमची चयापचय क्षमता वाढवण्यासाठी नियमितपणे शारीरिक हालचाली करा.
३) तुमच्या शरीराच्या विश्रांती आणि तंदुरुस्तीसाठी पुरेशी झोप घ्या.
४) ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारख्या तणाव कमी करणाऱ्या गोष्टींचा सराव करा.
५) डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घ्या.