वाढते वय आणि बदलते वातावरण यामुळे शरीरातील हाडे कमकुवत होतात. अशावेळी हाडांचे दुखणे वाढू लागते. हाडे मजबूत असतील तर शरीर मजबुतीने काम करू शकते. पण, हाडांचे दुखणे वाढले की शरीर थकते, आजारी असल्यासारखे वाटते. हे शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असल्याचे अनेकदा डॉक्टरांकडून सांगितले जाते, ज्यावर उपाय म्हणून डॉक्टर व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याचा सल्ला देतात. अशावेळी आपणही व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गोळी एकाच वेळी घेतो.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आपल्या हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. व्हिटॅमिन डी तुमची रोगप्रतिकारकशक्ती आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. डॉक्टर अनेकदा या दोन्ही गोळ्या एकत्र लिहून देतात. मात्र, दोन्ही एकाच वेळी घेऊ शकतो का याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. याच प्रश्नावरचे उत्तर एका संशोधनातून समोर आले आहे.

हेल्थच्या अहवालानुसार, जर तुम्ही व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गोळी एकत्र घेत असाल तर घाबरण्याची गरज नाही.

पण २०१९ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची गोळी एकत्र घेतल्याने स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. तसेच याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, याविषयीदेखील अभ्यासकांनी पूर्वीचे पुरावे पाहिले होते.

दरम्यान, इतर संशोधकांनी ठळकपणे सांगितले की, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी गोळी एकत्र खाणे योग्य आहे, विशेषतः वृद्ध प्रौढांसाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र, या दोन्ही गोळ्यांचा जास्त वापर फायदेशीर ठरू शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांकडूनही व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचे अतिसेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान, एका प्रौढ व्यक्तीला दिवसभरात विविध खाद्यपदार्थ आणि पेयांमधून २५०० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळणे सुरक्षित प्रमाण आहे, तर व्हिटॅमिन डीची सुरक्षित मर्यादा दररोज १०० मिलीग्रॅम आहे.