Dizziness standing up Causes: तुम्हालाही कधी-कधी अचानक उभं राहिल्यावर चक्कर येते का? जर ही समस्या वारंवार होत असेल, तर तिला साधी समजून दुर्लक्ष करू नका. हे एक लक्षण गंभीर आजारांची सूचना देऊ शकते. अनेक लोक याला फक्त अशक्तपणा, थकवा किंवा लो बीपी समजतात आणि दुर्लक्ष करतात. पण ही समस्या हृदय, मेंदू किंवा नर्व्ह सिस्टमशी संबंधित आजारांचं सुरुवातीचं लक्षण असू शकते.
वारंवार चक्कर येणं ही फक्त एक सामान्य शारीरिक गोष्ट नसून, कधी-कधी हे एखाद्या गंभीर आजाराचं संकेतही असू शकतं. आपलं शरीर वेगवेगळ्या प्रकारे आजारांचे इशारे देतं, आणि हे इशारे वेळेवर समजले, तर आजार वाढण्याआधीच त्यावर उपाय करता येतो. चला तर मग आजच्या या लेखात समजून घेऊया की वारंवार चक्कर येणं कोणत्या गंभीर आरोग्य समस्यांशी जोडलेलं असू शकतं आणि अशा वेळी आपण कधी सावध व्हायला हवं.
अॅनिमियादेखील असू शकतं एक कारण (Dizziness Reason)
जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तरही वारंवार चक्कर येऊ शकते. अॅनिमिया म्हणजे रक्तात लाल पेशींची संख्या कमी होणं, ज्यामुळे मेंदूपर्यंत पुरेशी ऑक्सिजन पोहोचत नाही. यासोबतच थकवा, अशक्तपणा आणि त्वचेवर पिवळसरपणा असे लक्षणंही दिसू शकतात.
ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन (अचानक उभं राहिल्यावर रक्तदाब कमी होणं)
अचानक उभं राहिल्यावर चक्कर येण्याचं एक कारण ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन असू शकतं. हे तेव्हा होतं, जेव्हा तुम्ही झोपलेली किंवा बसलेली स्थिती अचानक बदलून उभं राहता आणि रक्तदाब पटकन कमी होतो. अशा वेळी, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायांकडे जास्त जातं आणि मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. त्यामुळे थोडी चक्कर येते किंवा डोळ्यांसमोर अंधार दिसतो. हेच ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशनची लक्षणं आहेत.
डिहायड्रेशन
चक्कर येण्यामागे डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता हीसुद्धा एक कारण असू शकतं. जेव्हा शरीरात पुरेसं पाणी नसतं, तेव्हा रक्ताची मात्रा कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणं कठीण होतं. काही औषधं आणि खूप दिवस बेडवर पडून राहिलं तरी ही समस्या होऊ शकते. यावर सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं आणि हळूहळू उभं राहणं.
ब्लड प्रेशरची समस्या
जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल, तर अचानक चक्कर येऊ शकते. कारण ब्लड प्रेशरमुळे मेंदूपर्यंत पुरेसं रक्त जात नाही. कधी-कधी हाय ब्लड प्रेशरसाठी घेतल्या जाणाऱ्या काही औषधांमुळेही ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन होऊ शकतं.
जर तुम्हाला वारंवार उभं राहिल्यावर चक्कर येत असेल, किंवा त्यासोबत छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, धूसर दिसणं, बेशुद्ध होणं, अशक्तपणा किंवा बोलताना अडचण वाटत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.