Food To Avoid In Anger: आपल्या भावना आणि आपण खात असलेले अन्न यांच्यातील संबंधांवर आजवर अनेक आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञांनी भाष्य केले आहे. जसे काही खाद्यपदार्थ आपला उत्साह, ऊर्जा वाढवू शकतात तर काही असे पदार्थ आहेत जे आपल्यातील राग, दुःख वाढवणारे हार्मोन्स सक्रिय करू शकतात. जर तुम्ही अगोदरच नकारात्मक भावना अनुभवत असाल तर त्यावेळी काही पदार्थांचे सेवन विशेष टाळायला हवे.
भारतीय समुपदेशक परिषद आणि WICCI NPWC च्या सदस्य, समुपदेशक, कौटुंबिक थेरपिस्ट अर्चना सिंघल यांनी हेल्थशॉट्सला दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही रागात असताना काय खावे व काय खाऊ नये याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
रागात ‘हे’ ६ पदार्थ अजिबात खाऊ नका
उत्तेजक अन्न व पेय
कॅफीनयुक्त पदार्थ जसे की, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, ब्लॅक टी, तुमच्या भावना तीव्र करू शकतात आणि मज्जासंस्था उत्तेजित करू शकतात. यामुळे चिंता, अस्वस्थता आणि चिडचिडेपणाची भावना वाढू शकते. कॅफीन तुमच्या झोपेच्या पद्धतींमध्ये देखील व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे तुमच्या मूडवर आणखी परिणाम होऊ शकतो.
साखरयुक्त पदार्थ
कँडीज, चॉकलेट्स, साखरयुक्त पेये आणि मिष्टान्न सारख्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्याने चढ-उतार होऊ शकते. यामुळे अचानक मूड बदलणे आणि चिडचिडेपणा होऊ शकतो. जास्त साखरेचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा फास्टफूड
प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे अनेकदा शरीरात अपायकारक फॅट्स, ऍडिटीव्ह वाढू शकतात. यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते तसेच न्यूरोट्रांसमीटरच्या संतुलनात व्यत्यय येऊन तुमची मनःस्थिती नकारात्मक व दुःखी होऊ शकते. फास्ट फूड नियमितपणे खाल्ल्याने आळशीपणा येऊ शकतो, काम पुढे ढकलले गेल्याने तुमची चिडचिड होऊ शकते.
मद्यपान
काही लोक राग किंवा तणावाचा सामना करण्यासाठी अल्कोहोलकडे वळू शकतात, परंतु सामान्यतः ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. अल्कोहोलमुळे उदासीनता वाढून निर्णयक्षमता बिघडू शकते. याने झोपेत व्यत्यय येऊन चिडचिड होऊ शकते.
मसालेदार पदार्थ
मसालेदार पदार्थांमुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊ शकते आणि अधिक ऊर्जेच्या प्रतिक्रिया देण्यासाठी शरीर सक्रिय होऊ शकते. मसालेदार पदार्थांमुळे पचनास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे निराशा किंवा चिडचिड होऊ शकते.
कार्बोहायड्रेट
पांढरे ब्रेड, पास्ता आणि पेस्ट्री यांसारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी जास्त होऊ शकते. यामुळे मनःस्थिती बदलू शकते, चिडचिड होऊ शकते आणि भावनिक स्थिरता कमी होऊ शकते, राग वाढू शकतो.
रागात ‘या’ पदार्थांचे सेवन करणे ठरते फायदेशीर
- फळे आणि भाज्या: आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करणाऱ्या विविध प्रकारची फळे आणि भाज्या खा फळे आणि भाज्या जसे की बेरी, लिंबूवर्गीय फळे, पालेभाज्या आणि क्रूसीफेरस भाज्या खा.
- प्रथिने: आपल्या जेवणात अंडी, मासे, टोफू, शेंगा आणि ग्रीक दही यांसारखे प्रोटीन स्त्रोत समाविष्ट करा. प्रथिनांमध्ये अमीनो ऍसिड असतात जे न्यूरोट्रांसमीटर उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण असतात. तसेच सेरोटोनिन वाढल्याने आनंदी भावना निर्माण होऊ शकते.
- ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्: ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् समृध्द फूड आहारात समाविष्ट करा. जसे की फॅटी फिश (सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन), अक्रोड, चिया बिया आणि फ्लेक्ससीड्स यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
- कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स: संपूर्ण धान्य जसे की ब्राऊन राइस, ओट्स आणि गव्हाचे ब्रेड तुमच्या आहारात समाविष्ट करा. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. उर्जेच्या स्थिर प्रकाशनास प्रोत्साहन देतात, जे अधिक स्थिर मूडमध्ये योगदान देऊ शकतात.
- मॅग्नेशियम समृध्द अन्न: निरोगी मज्जासंस्था राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मॅग्नेशियम महत्वाचे आहे. तुमच्या मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुमच्या आहारात पालक, काळे, बदाम, काजू आणि एवोकॅडो यासारखे पदार्थ समाविष्ट करा.
बिस्कीटचा पुडा उघडताच बिस्किटे नरम पडतात? पावसाळ्यात ‘या’ जुगाडू टिप्स वाचवतील पैसे
- हर्बल टी: कॅमोमाइल, लॅव्हेंडर आणि पॅशनफ्लॉवर सारख्या काही हर्बल टी, शांत गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. एक कप हर्बल चहाचा आस्वाद घेतल्याने आराम मिळू शकतो आणि रागाची भावना कमी होते.
दरम्यान यासगळ्याबरोबर तुम्हाला व्यायाम व मनःशांतीसाठी ध्यानधारणा करण्यासाठी काही वेळ काढणे महत्त्वाचे आहे.