कुत्रा चावण्याच्या घटनेला हलक्यात घेऊ नये कारण त्यामुळे रेबीजसारख्या प्राणघातक आजाराचा धोका असतो. रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे जो वेळेवर उपचार न केल्यास १००% प्राणघातक ठरू शकतो. म्हणून योग्य वेळी प्रथमोपचार आणि वैद्यकीय उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. कुत्र्याच्या चाव्याला कुत्रा चावणे म्हणतात. कुत्र्याचा चावा तीन प्रकारचा असू शकतो: श्रेणी १, श्रेणी २, श्रेणी ३.
कुत्रा चावल्याच्या पहिली श्रेणी ही सर्वात सौम्य प्रकार आहे ज्यामध्ये फक्त कुत्रा स्पर्श करतो किंवा चाटतो. या प्रकारात, कुत्रा फक्त त्वचेचा वास घेतो किंवा चाटतो ज्यामुळे त्वचेवर ओरखडे किंवा कापण्याचे चिन्ह दिसत नाही. या श्रेणीतील रुग्णांना कोणत्याही लसीची आवश्यकता नसते.
दुसरी श्रेणी म्हणजे पीडित व्यक्तीला मध्यम धोकादायत असते. यामध्ये, कुत्रा त्वचेवर थोडासा ओरखडा किंवा स्पर्श करतो ज्यामुळे रक्त येत नाही पण चट्टे दिसतात. कुत्र्याचे नखांचे ओरखडे पडू शकतात. अशा परिस्थितीत, रुग्णाला अँटी-रेबीज लस (Anti-Rabies Vaccine) घ्यावी लागते.
तिसरी श्रेणी हा सर्वात धोकादायक आहे. यामध्ये कुत्रा गंभीररित्या चावतो, ज्यामुळे मृत्यू होतो. यामध्ये कुत्रा रुग्णाला अनेक ठिकाणी चावतो. कुत्र्याच्या चावण्यामध्ये त्वचा फाटते. कुत्र्याचे तोंडातील लाळ जखम झालेल्या भागात लागल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
कुत्रा चावल्यानंतर काय करावे याबाबत माहिती देताना जनरल फिजिशियन डॉक्टर सचिन सिंग जैन यांनी सांगितले की,”कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. जर कुत्र्याच्या चाव्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर रेबीजचा विषाणू मेंदूत लवकर जाऊ शकतो. कुत्र्याच्या चाव्याला हलक्यात घेऊ नये आणि ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. जर कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला रेबीज झाला तर रुग्णाचा मृत्यू निश्चित आहे. कुत्रा चावल्यानंतर प्रथमोपचार कसे करावे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या.
भटका कुत्रा चावल्यानंतर प्रथमोपचार घेणे आवश्यक आहे का?
जर भटका कुत्रा चावल्यास त्वरित तुमची जखम धुवून काढा. जखम कमीत कमी १० ते १५ मिनिटांपर्यंत धुवा. जखम स्वच्छ करा. जखम साफ करण्यासाठी पाणी आणि साबणाचा वापर करू शकता. कुत्रा चावल्यानंतर जखम धुतल्याने विषांणूचा प्रभाव कमी करणे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात पहिले पाऊल आहे.
जखम धुतल्यानंतर त्यावर अँटिसेप्टिक लावा. povidone-iodineसारखे अँटिसेप्टिक लावा जेणेकरून विषाणुजन्य संसर्क टाळता येतो. कुत्रा चावल्यानंतर जखेमतून सतत रक्तप्रवाह होत असेल तर स्वच्छ कपडा किंवा पट्टीने दाबून ठेवा आणि रक्तप्रवाह थांबवा आणि ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. कुत्रा चावल्यानंतर कोणत्याही जखमेचे उपचार घरच्या घरी करू नये डॉक्टरांकडे जाऊनच उपचार घ्यावे.
पाळीव कुत्रा चावला तर काय करावे?
जर पाळीव कुत्रा चावला तर त्वरित कुत्र्याचे रेबिज लसीची नोंद तपासा. जर पाळीव कुत्र्यावर १० दिवस लक्ष ठेवा. जर कुत्रा हेल्दी असेल तर संसर्गाचा धोका कमी असते पण तरीही डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
रेबीज रोखण्यासाठी कोणते इंजेक्शन द्यावे?
कुत्रा चावल्यानंतर Anti-Rabies Vaccine – ARV घ्या. कुत्रा चावल्याच्या दिवसापासून ही लस घ्यायला सुरू होते आणि ज्याचे ५ डोसचा संपूर्ण कोर्स असतो जो पूर्ण करणे आवश्यक आहे.
Rabies Immunoglobulin – RIG लावा. जर कुत्रा चावल्याची जखम रक्तस्त्रावासारखी गंभीर असेल तर पहिल्या दिवशी आरआयजी इंजेक्शनने उपचार केले जातात. ते विषाणू शरीरात पसरण्यापासून रोखते.
टिटॅनस इंजेक्शन द्या. जर मागील टिटॅनस इंजेक्शन ५ वर्षांपूर्वी घेतले नसेल, तर डॉक्टर टिटॅनसची शिफारस देखील करू शकतात.