Spicy Food Heart Health: भारतीय जेवणाचा विचार केला जातो तेव्हा चटपटीत पदार्थांसह तिखट पदार्थांचाही उल्लेख प्रकर्षाने केला जातो. भारतीय लोकांना चटपटीत आणि तिखट पदार्थ खायला खूप आवडतात. भारतीय जेवण आणि त्यांचे मसाले जगभर प्रसिद्ध आहेत. जर जेवणात तिखटपणा नसेल तर अनेक जण पोटभर जेवत नाहीत. पण, तुम्हाला माहिती आहे का की तिखट पदार्थांचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जर तुम्ही जास्त प्रमाणात लाल, हिरव्या मिरचीचे सेवन केले तर तुम्हाला अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

हल्ली अनेक जण स्टॉलवर विकले जाणारे वडापाव, पाणीपुरी, पावभाजी, मिसळ, चायनीज, फ्रँकी अशा भरपूर तिखट पदार्थांचे सेवन दैनंदिन जीवनात आवर्जून करतात. या पदार्थांच्या चटकदार चवीमुळे हे पदार्थ खाल्ल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. परंतु, हेच पदार्थ हळूहळू तुमचे शरीर आजारग्रस्त करण्यास कारणीभूत ठरू शकते.

तिखट पदार्थ सतत का खाऊ नये?

पचन

जास्त लाल मिरची खाल्ल्याने पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी आणि अल्सरसारख्या समस्या उद्भवू शकतात

पोटदुखीची समस्या

जास्त तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते, म्हणून मर्यादित प्रमाणात हे पदार्ख खा. सतत अशा पदार्थांचे सेवन करण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच यामुळे पोटात जास्त जळजळ होते. मळमळ, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ, जुलाब आणि गॅसची समस्या उद्भवते.

त्वचाविकार

जास्त तिखट पदार्थांचे सेवन सतत केल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो निघून जातो, यामुळे अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स, अॅलर्जीदेखील होऊ शकते.

आतड्यांवर परिणाम

सतत अशा पदार्थांच्या सेवनाने आतड्यांवर परिणाम होऊ शकतो, शिवाय इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) असणाऱ्यांचा त्रास वाढू शकतो.

हृदयाचे ठोके वाढणे

अनेक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जास्त तिखट अन्न खाल्ल्याने हृदयाचे ठोके वाढू शकतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.