Health benefits of green chillies: भारतीय पदार्थांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मिरचीमुळे अन्न झणझणीत आणि चविष्ट बनवण्यास मदत करते. हिरव्या मिरचीचे सेवन आरोग्यासाठीही चांगले मानले जाते. हिरव्या मिरच्या केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत, तर अनेक आरोग्यदायी फायदेदेखील देतात. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी६, सी, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने व कार्बोहायड्रेट्स, बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन झेक्सॅन्थिन यांसारखे पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देण्यास मदत करतात.

हिरवी मिरची खाण्याचे फायदे

हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन-ए आढळते, जे दृष्टी सुधारण्यास व डोळे निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. हिरवी मिरची अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हिरव्या मिरच्यांमध्ये भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असतात, जे पचनासाठी फायदेशीर ठरू शकतात.

हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म भरपूर असण्याबरोबर त्यात कॅलरीज नसतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. दररोज हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.

मिरच्यांमध्ये आढळणारे कॅप्सेसिन हे संयुग शरीरातील वेदना कमी करू शकते. हे संयुग आपल्या मज्जासंस्थेत प्रवेश करते आणि वेदना कमी करते. हिरवी मिरची खाल्ल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे जी छातीत जळजळ होते, त्यापासूनही आराम मिळू शकतो.

हिरवी मिरची खाणे हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांतून असे दिसून आले आहे की, हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने शरीरात जमा होणारे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हिरवी मिरचीदेखील चमत्कारिक मानली जाऊ शकते. हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही हिरवी मिरची प्रभावी मानली जाऊ शकते. हिरव्या मिरच्यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.