Drink Sugarcane Juice: हल्ली शहरातील प्रत्येक चौकात एक तरी उसाचा रस विकणारा विक्रेता पाहायला मिळतो. उष्णता कमी करण्यासाठी आणि तहान भागविण्यासाठी लोक उसाचा रस आवर्जून पितात. उसाच्या रसात लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, खनिजे, मॅग्निशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? हा रस काही लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. कारण- त्यांनी हा रस प्यायल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
उसाचा रस कधी आणि कोणी पिऊ नये?
सर्दी आणि खोकला झाल्यावर
जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही त्या काळात उसाचा रस पिऊ नये.
अन्न विषबाधा झाल्यावर
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अन्न विषबाधा झाली असेल, तर तुम्ही उसाचा रस पिणे टाळावे. कारण- त्यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
गर्भवती महिला
कोणत्याही गर्भवती महिलेने डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उसाचा रस पिणे योग्य ठरणार नाही. कारण- या काळात लवकर गेस्टेशनल डायबेटीस होण्याचा धोका निर्माण होते.
डोकेदुखी
डोके दुखत असताना उसाचा रस पिणे टाळावे. कारण- बहुतांश प्रमाणात उसाच्या रसात बर्फ वापरला जातो. डोके दुखत असताना उसाचा रस प्यायल्याने तुमची डोकेदुखी आणखी वाढण्याचा धोका संभवतो. मग अशा वेळी तुम्हाला उसाचा रस प्यायचा असेल, तर तो बर्फविरहीत स्वरूपात पिऊ शकता.
लठ्ठपणा
जर तुम्ही उसाचा रस न पिणे योग्य ठरेल. कारण- त्यामुळे शरीरात उष्मांकांचे प्रमाण वाढू शकते. आणि उष्मांकांचे प्रमाण वाढल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.