हिंदू धर्मात नवरात्रात नवरात्री आणि कन्या पूजनाचे विशेष महत्व आहे. तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसात कधीही तुम्ही कन्या पूजा करू शकतात. मात्र अष्टमी आणि नवमी तिथी हे कन्या पूजनेसाठी सर्वोत्तम दिवस मानले जातात. या दिवसांमध्ये जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये उपवास करतात. अशा महिलावर्ग विशेषतः मुलीची पूजा करतात. पण जे लोक फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात किंवा काही कारणास्तव उपवास करत नाहीत त्यांनाही कन्या पूजन करायचे आहे. कारण असे मानले जाते की कन्या पूजा केल्यानंतरच देवीची पूजा यशस्वी मानली जाते. तुम्हाला नवरात्री पूजेचा पूर्ण लाभ मिळावा अशी तुमची इच्छा असल्यास, कन्याची पूजा करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कन्या पूजेचे महत्त्व काय आहे आणि कंजकला खायला देताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

कन्या पूजेचे महत्त्व

नवरात्रीची नऊ दिवसांची शक्ती पूजा माता राणीचे रूप समजल्या जाणाऱ्या मुलींच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते. आई, देवीची पूजा, हवन, तपस्या आणि दानधर्म एवढी प्रसन्न होत नाही, जितकी मुलींची पूजा केली जाते म्हणूनच नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या कन्येला कल्याणी, पाच वर्षांच्या कन्येला रोहिणी, सहा वर्षाच्या कन्येला कालिका, आठ वर्षांच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात.

कन्या पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

पूजा करण्यापूर्वी, ज्या ठिकाणी मुलीची पूजा करायची आहे ती जागा तुम्ही पूर्णपणे स्वच्छ केली पाहिजे.

कन्या पूजा करताना त्यांच्याबरोबर एका मुलाला ठेवणे आवश्यक आहे. मुलींप्रमाणे, मुलाला बटुक भैरवाचे प्रतीक मानले जाते. माता देवीच्या पूजेनंतर भैरवाची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते.

कन्या पूजेमध्ये फक्त २ वर्ष ते १० वर्षांच्या मुलींना आमंत्रित करा.

मुलींना पूजेसाठी बसवण्यापूर्वी तुम्ही त्यांचे पाय दूध आणि पाण्याने धुवून घेतल्याचे चांगले मानले जाते.

मुलींना आणि मुलाला आसनावर बसवून त्यांची आदरपूर्वक पूजा करा आणि त्यांना जेवण द्या.

तुमच्या क्षमतेनुसार आपण कन्या पूजेमध्ये कोणतेही सात्विक अन्न तुम्ही देऊ शकता. यात त्यांना खीर, पुरी, हलवा, हरभरा, नारळ, दही, जलेबी यासारख्या वस्तू अर्पण करणे पारंपारिक मानले जाते.

जेवण झाल्यावर मुलींना आणि मुलाला काही भेटवस्तू द्या. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार देखील भेटवस्तू निवडू शकता.

शेवटी मुली आणि मुलांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( टीप: वरील महितीचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)