Remedies for preserving wheat flour: भारतीय आहारात गव्हाच्या पिठाची पोळी म्हणेच चपाती घरोघरी दररोज बनवली जाते. भाताप्रमाणेच पोळीदेखील आहारातील महत्त्वाचा भाग आहे. पण, बाजारातून विकत आणलेल्या पिठात किंवा घरच्या गव्हाच्या पिठात किडे होण्याची समस्या अनेकांना सतावते. हे किडे पीठ जास्त दिवस न वापरल्यासही होतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तब्बल पाच ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळदेखील हे पीठ साठवू शकता. कसे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अनेक जण प्लास्टिकच्या डब्यात किंवा गोण्यांमध्ये पीठ साठवतात. परंतु, ही पद्धत पीठ जास्त काळ साठविण्यासाठी योग्य नाही. अशा प्रकारे पीठ साठवल्यास त्यात ओलावा निर्माण होतो आणि त्यामुळे पीठ लवकर खराब होते. अशा वेळी पीठ साठविण्यासाठी ॲल्युमिनियम किंवा स्टीलचा डबा वापरावा. या डब्यांमध्ये पीठ ठेवण्यापूर्वी ते डबे स्वच्छ करून, कडक उन्हात सुकवूनही घ्यावे.
तमालपत्र
गव्हाच्या पिठात किडे होऊ नयेत यासाठी तमालपत्रदेखील खूप फायदेशीर आहे. तमालपत्राचा वास खूप तीव्र असतो. त्यामुळे कीटक त्याच्याजवळ येत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही ज्या डब्यात पीठ साठवत आहात, त्यात सात-आठ तमालपत्रे ठेवा.
मिठाचा वापर करा
गव्हाचे पीठ दीर्घकाळ टिकविण्यासाठी व कीटकांना पिठापासून दूर ठेवण्यासाठी मीठ खूप फायदेशीर ठरेल. त्यासाठी गव्हाच्या पिठाच्या वजनानुसार एक किंवा दोन चमचे मीठ मिसळून डब्यात भरून ठेवा. त्यामुळे या पद्धतीन तुम्ही महिनाभर पीठ ताजे ठेवू शकता.
फ्रिजचा वापर
पीठ जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी आणि कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही फ्रिजचा वापर करू शकता. त्यासाठी पीठ एअर टाईट प्लास्टिकच्या पिशवीत टाकून फ्रिजमध्ये ठेवा. पिठापर्यंत ओलावा पोहोचू नये याची काळजी घ्या; अन्यथा ते खराब होऊ शकते.
हेही वाचा: तांदळाच्या डब्यातील किडे पळवून लावण्यासाठी ‘हे’ सोप्पे उपाय नक्की करा
सुकलेली लाल मिरची
गव्हाच्या पिठात किडे होऊ नयेत म्हणून तुम्ही कोरडी मिरची वापरू शकता. त्यासाठी १०-१२ सुक्या मिरच्या मिसळा. मिरची पिठात मिक्स करताना मिरचीचे दाणे पिठात मिसळणार नाहीत याची काळजी घ्या. पीठ बाहेर काढल्यावर ते चाळणीतून चाळून घ्या. कोरड्या मिरचीमुळे पिठात किडे होत नाहीत.