तुमच्या जोडीदाराने किंवा एक्स-जोडीदाराने तुम्हाला अनेक वेळा सांगितले आहे का की ‘तु उगाच चिडते आहेस’ किंवा स्वत:ची स्पष्टपणे चूक असूनही स्वत:बरोबर कसा अन्याय होत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का? जर जर या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर बहुधा तुम्ही अशा व्यक्तीचा सामना करत आहात, जो चुटकीसरशी कोणाचेही मत परिवर्तन करून स्वत:चा दोष इतरांवर टाकू शकतो. हा एक मानसिक खेळ आहे जो तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर कायमचा प्रभाव पडू शकतो.रिलेशनशिपमध्ये भावनिकरित्या नियंत्रित करण्याची चिन्हे खूप वेगवेगळी असू शकतात तरीही, नुमरोवाणी येथील रिलेशनशिप कोच सिद्धार्थ एस. कुमार म्हणतात की, “रिलेशनशिपमध्ये हे ‘माइंड गेम्स’ ओळखणे ही योग्य सीमा निर्माण करणे ही पहिली पायरी आहे.

रिलेशनशिपमध्ये चुकीच्या वागणूकीचा एक भयानक रूप असते ‘गॅसलाइट’ करणे. या स्थितीमध्ये लोक आपली स्मरणशक्ती आणि विचारांवरच प्रश्न उपस्थित करतात. ‘गॅसलाइटिंग’मध्ये कोणीतरी अशा प्रकारे आपला ब्रेन वॉश (मूळ मतांचा त्याग करून नवीन मते स्वीकारण्यास भाग पाडण्याची एक पद्धत) करतो आपल्यावर अन्याय झाला असूनही आपल्याच मनात चूक केल्याची भावना निर्माण करतो. जर तुमचा जोडीदार हुशार असेल तर तो खोट बोलून किंवा विषय फिरवून तुम्हाला चुकीचे ठरवू शकतो. एवढंच नाही तर चूक तुमचीच होते हे पटवून देण्यातही तो यशस्वी होतो पण प्रत्यक्षात तुमची काहीही चूक नसते. यालाच ‘गॅसलाइटिंग’ म्हणतात. दुसऱ्याचा विश्वास संपादन करून जिंकण्यासाठी लोक ‘गॅसलाइटिंग’ करतात. त्यासाठी ते सुरुवातीला ‘गॅसलाइटिंग’ करून तुमचा आत्मविश्वास कमी करतात आणि मग तुम्हाला दिलासा देऊन तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.

diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin
Skin Care : स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ पदार्थ चुकूनही चेहऱ्यावर लावू नका; अन्यथा…
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

तुम्हाला गॅसलाइट केले जात आहे हे समजणे फार कठीण आहे कारण बहुतेक वेळा पीडिताला हे समजत नाही की त्याच्याशी वाईट वागणूक दिली जात आहे. तथापि, तुम्हाला गॅसलाइट केले जात आहे हे पाहण्यासाठी काही चिन्हे आहेत –

तुमच्या मनात भावनिक चढ-उतार निर्माण करतात

गॅससलाइट करणारे अनेकदा आपल्याला कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागवतात आणि आपल्या भावनांशी खेळण्यात उत्कृष्ट असतात. ते एका क्षणी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करू शकतात आणि दुसर्‍या क्षणी ते काहीच संबध नसल्यासारखे वागतात. यामुळे तुमच्या मनात एक भावनिक चढ-उतार तयार होईल ज्यामुळे तुमची भावनिक स्थिरता मिळवण्यासाठी तळमळ होईल. “कधीकधी ते खूप बोलके आणि प्रेमळ असू शकतात आणि इतर वेळी ते कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अलिप्त वागतात किंवा प्रतिसाद देत नाहीत. ही युक्ती वापरून ते तुम्हाला त्यांच्या बोटांखाली दाबून ठेवतात, ज्यामुळे सुरक्षित भावनिक पाया निर्माण करणे कठीण होते,” असे कुमार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – तुम्हीच खराब करताय तुमचं नातं! आजच सोडा तुमच्या या चुकीच्या सवयी

तुमचा जोडीदार स्वतः पीडित असल्यासारखे वागतात

गैरवर्तन करणारा तुम्हाला अपराधी वाटेल आणि नेहमी स्वतःला दोष देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या या वागण्यामुळे तुम्ही काही बोलण्यापूर्वी दोनदा विचार करू शकता किंवा स्वतःला नालायक समजू शकता. जर तुमच्या जोडीदाराला विषय पलटवण्याची आणि स्वतःला पीडित म्हणून दाखवण्यात हातोटी असेल, त्यांची ही एक युक्ती जी त्यांच्या चूकींपासून तुमचे लक्ष विचलित दुसरीकडे वळवत असतील तर ते कदाचित ते तुम्हाला भावनिकरित्या नियंत्रित करत आहेत. “यामुळे तुमच्या रिलेशनशिपमधील मूळ समस्या सोडवणे तुम्हाला कठीण होऊ शकते, म्हणून जर तुमचा जोडीदार सातत्याने जबाबदारी टाळत असेल आणि स्वतः पीडित असल्यासारखे वागत असेल तर सावध रहा,” असे कुमार यांनी नमूद केले.

तुमचा इतरांपासून संबध तोडण्याचा प्रयत्न करतो

‘गॅसलाइटिंग’मध्ये तुमचा जोडीदार जाणीवपूर्वक इतरांपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांबरोबरचे संबध जबरदस्तीने तोडण्यास प्रवृत्त करतो. “तुमच्यामध्ये परावलंबित्वाची भावना निर्माण करून, ते तुमच्यावर त्यांचे नियंत्रण मजबूत करतात. जर तुम्ही स्वतःला तुमच्या प्रियजनांपासून अधिकाधिक दूर जात आहात असे वाटत असेल, तर अशा वागणूकीमागील हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आवश्यक आहे,” असे कुमार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – तुमच्या जोडीदाराला खूप राग येतो का? रिलेशनशिप एक्सपर्टने सांगितले रागवणारा जोडीदार असण्याचे फायदे

तुमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतात

जेव्हा कोणी तुम्हाला गॅसलाइट करण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा ते तुम्हाला धमकावण्याचाही प्रयत्न करतील. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी तो तुम्हाला दोषही देऊ शकतो. तो हे सर्व अशा प्रकारे करेल की आपल्याला अक्षरशः आपली चूक वाटू लागेल’गॅसलाइटिंग’मध्ये एक शक्तिशाली शस्त्र म्हणून अपराधीपणाची भावनेचा वापर केला जातो. ते तुमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करून तुमचा वापर करू शकतात.- तुमच्या मानसिक स्थितीसाठी तुम्हालाच जबाबदार ठरवतात किंवा तुमच्या सध्याच्या निवडी नियंत्रित करण्यासाठी भूतकाळातील चुका वापरतात. “आपल्या स्वतःची प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी जेव्हा अपराधीपणाला शस्त्र बनवले जाते तेव्हा हे ओळखणे महत्वाचे आहे की तुम्ही लेशनमध्ये ‘गॅसलाइटिंग’ होत आहे.” असे कुमार यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसाठी लोकांची माफी मागायला सुरुवात केली आहे का? सतत अपराधीपणाची भावना जाणवणे ‘गॅसलाइटिंग’चा परिणाम आहे.

तुमचा जोडीदार तुमची सतत टीका करतो का?

सतत दोष देऊन, तो तुम्हाला इतके कमकुवत केले जाते की तुम्ही बहुतेक वेळा अस्वस्थ आणि सर्व गोष्टींबद्दल काळजीत असाल. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींबद्दलही तुमचे मन नेहमी गोंधळलेले असते. तुमच्या मनातील गोंधळामुळे निर्णय घेण्यात अडचण येईल. तुम्ही चुकीचे निर्णय घेण्यास सुरुवात करू शकता कारण तुमच्या निर्णयावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या मनात भरलेल्या मूर्ख आणि निराधार विचारांमुळे तुमचे विचार नष्ट होतील. तुमच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मन न दुखावता केली जाणारी टीका फायदेशीर ठरू शकते, परंतु कुमार सांगतात की, सतत आणि अनावश्यक नकारात्मकता निर्माण करणारी टिका हे रिलेशनशिपमध्ये ‘गॅसलाइटिंग’ होत असल्याते स्पष्ट चिन्ह आहे. तुमचा जोडीदार अनेकदा तुमच्या आत्मसन्मानाला दूर ठेवण्यासाठी टीकेचा वापर करतात, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या मतांवर अधिक अवलंबून राहता. जर तुमचा जोडीदार तुमच्या कर्तृत्वाला सतत कमी करत असेल किंवा तुमच्या आकांक्षांना कमी लेखत असेल, तर ते ‘गॅसलाइटिंग’चे लक्षण असू शकते.”

तुम्हाला गॅसलाइट केले जात आहे हे समजणे फार कठीण आहे कारण बहुतेक वेळा पीडिताला हे समजत नाही की त्याच्याशी वाईट वागणूक दिली जात आहे. तथापि, तुम्हाला गॅसलाइट केले जात आहे हे पाहण्यासाठी काही संकेत आहेत.

हेही वाचा – २०२४मध्ये फिट राहण्यासाठी फक्त ‘या’ ५ गोष्टी करा!

रिलेशनशिपमधील ‘गॅसलाइटिंग’चा सामना कसा करावा?

  • कुमार यांच्या मते, तुम्ही ज्या कृती ‘माइंड गेम्स’ मानता त्या प्रथम ओळखणे महत्त्वाचे आहे. “या गॅसलाइटचा सामना करण्याची पहिली पायरी म्हणजे आधी ते ओळखायला शिका.”
  • ज्या विशिष्ट परिस्थितींमध्ये तुम्हाला अन्यायकारक वागणूक दिल्यासारखे वाटत असेल त्यांची नोंद ठेवणे, तुम्हाला त्याचा विरोध करण्यास आणि अधिक स्पष्ट मत तयार करण्यास मदत करू शकतात. “जरी जोडीदाराच्या ‘माइंड गेम्स’ किंवा ‘गॅसलाइटिंग’चा सामना करताना तुम्हाला तशीच प्रतिक्रिया देण्याचा मोह होऊ शकतो परंतु वारंवार असे केल्याने परिस्थिती आणखी बिघडेल आणि एक दुष्टचक्र निर्माण होईल,” असा सल्ला कुमार देतात.
  • शेवटचा उपाय म्हणजे नातेसंबंध समुपदेशक किंवा थेरपिस्टचा सल्ला घेणे हा असू शकतो. जर रिलेशनशिपमध्ये ‘माइंड गेम्स’ किंवा ‘गॅसलाइटिंग’अधिक गंभीर समस्यांचे संकेत देत असतील तर तुमच्यातील संवाद वाढविण्यासाठी आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञ काही पद्धती आणि साधने देऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये जोडप्यांचे समुपदेशन हा एक चांगला पर्याय आहे,” असे कुमार यांनी सांगितले.
  • तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, जोडीदाराचे ‘माइंड गेम्स’ किंवा ‘गॅसलाइटिंग’ कायम राहिल्यास, अशा नात्याबाबत पुन्हा विचार करण्याची वेळ येऊ शकते. “परिस्थिती किती गंभीर आहे आणि दोन्ही पक्ष समस्यांचे निराकरण करण्यासाठी किती इच्छुक आहेत यावर अवलंबून असू शकते. तुम्ही रिलेशिनशिपवर पुढे काम करण्याचा निर्णय घेऊ शकता, विश्रांती घेण्याचा किंवा काही विशिष्ट परिस्थितीत ते संपवण्याचा विचार करू शकता,” असा सल्ला कुमार यांनी दिला आहे.