इंडियन मेडिकल असोसिएशनचा डॉक्टरांना सल्ला
डॉक्टरांकडून वयस्कर रुग्णानां सर्दी, फुप्फुसांचे आजार, घशाला सूज आणि सायनससारख्या विविध आजारांवर दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविके औषधे दिली जातात. मात्र या औषधांचे अधिक सेवन धोकादायक असल्याने ही औषधे डॉक्टरांनी देऊ नये, असे द इंडियन मेडिकल असोसिएशन
(आयएमए)ने सांगितले.
सध्याच्या दिवसात अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार हे सर्वसामान्य असून बाह्य़ विभागातील बहुतांश रुग्ण हे याच कारणास्तव डॉक्टरांकडे येतात आणि त्यातून बचावासाठी त्यांना प्रतिजैविके औषधे घेण्याचा सल्ला देण्यात येतो. रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागात दिली जाणारी ५० टक्क्य़ांपेक्षा ही जास्त प्रतिजैविक औषधे विनाकारण किंवा अयोग्य असल्याचा दावा आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. एस. अग्रवाल यांनी केला आहे.
श्वासोच्छ्वासाच्या तीव्र संसर्ग(एआरटीआय)च्या बाबत प्रतिजैविक औषधांचा अयोग्य वापर हा अतिमहत्त्वाचा घटक असून त्यामुळे संसर्गाविरोधात प्रतिजैविक-प्रतिकारशक्ती तयार होत असते. हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यासाठीच आयएमएने डॉक्टरांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवताना दोन आठवडय़ांपासून सर्दीची सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांशी त्यानुसार संवाद साधण्याचे सूचित केले आहे.
जेव्हा रुग्णाची परिस्थिती बिघडलेली असेल किंवा निच्छित कालावधीनंतर देखील त्यात सुधारणा होत नसेल तेव्हाच प्रतिजैविक औषधे घेण्याबाबत हस्तक्षेप करावा.शिवाय जोपर्यंत क्लिष्ट फुप्फुसांचा आजार किंवा न्यूमोनिया झालेला नसेल तोपर्यंत तरी प्रतिजैविक औषधे घेण्याचा सल्ला देवू नये असेही आयएमएचे सेक्रेटरी जनरल डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्या मतानुसार अशा परिस्थितीत रोगलक्षणानुसार कफ सप्रेसेन्टं(खोकल्यापासून), एक्सपेक्ट्रोन्टंस्(कफपासून), अंन्थीस्टॅमिनेस (पेशीतजालात हिस्टॅमिनच्या स्वीकारास अडथळा आणणारे औषध), डिकाँन्जेस्टंन्टस(चोंदलेले नाक साफ करणारे औषध) आणि बिटा-अगोनिस्ट ही औषधे पुरेशी आहेत. प्रतिजैविक औषधे ही तेव्हाच द्यावीत जेव्हा स्ट्रेप टेस्टमध्ये गंभीर अशा स्वरूपाचा घशाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत नाही. तर दुसऱ्या स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये अस्परीन, असेटामिनोफेन, नॉनस्टिरियोडाल अशा वेदनाशामक विरोधी उपचारपद्धती आणि गोड गोळीचा वापर हा घशातील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)