भारतात जवळपास प्रत्येत घरामध्ये नारळ वापराला जातो. पुजेपासून स्वयंपाकापर्यंत प्रत्येक गोष्टीत नारळाचा वापर हा हमखास केल जातो.
नारळाच्या शेंड्यापासून खोबऱ्यापर्यंत नारळाचे अनेक फायदे आहे हे आपल्याला माहित आहे. नारळाचे खोबरे आणि नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नारळाच्या शेंड्याचा काथ्या म्हणजे भांडे घासण्यासाठी अथवा खत म्हणून म्हणून वापर केला जातो. त्याप्रमाणे नारळ्या करवंटीचे फायदे आहेत. अनेकदा पक्ष्यांचे घरटे अछवा शोपीस तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. टाकाऊ वस्तूंपासून टिकावू वस्तू तयार करण्यासाठी नारळाची करवंटी अंत्यत फायदेशीर आहे. नारळाच्या करवंटीपासून अंगठी ठेवण्याचा बॉक्स कसा तयार करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत… चला तर मग जाणून घेऊ या.. सोपी ट्रिक

इंस्टाग्रामवर chiratta_company नावाच्या अकांउटवर नारळाच्या करंवटीपासून अंगठीचा बॉक्स कसा तयार करावा हे सांगितले आहे.
१) नारळाच्या करवंटीचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या.
२) फायलरने घासून त्यांना मऊ करून घ्या.
३) त्यानंतर बॉक्सच्या आकारामध्ये सर्व बॉक्स जोडून घ्या.
४) बॉक्सच्या वरच्या झाकणाावर नक्षी तयार करण्यासाठी त्यावर उभ्या आडव्या रेषांच्या जागेवर घासा. चौकोनी बॉक्स नक्षी तयार होईल.
५ ) बॉक्सला लॉक करण्यासाठी छोटेसे समान आकाराचे चौकोन तयार करा त्याला मधोमध बीळ पाडा.

हेही वाचा – खोबऱ्यासाठी नारळ आपटून वैतागलात? नारळ फोडण्याची ‘ही’ सोपी पद्धत एकदा वापरून पाहा

६) त्यातील दोन चौकोन बॉक्सवर आणि १ चौकोन बॉक्सच्या झाकणावर लावा. झाकण लावण्यानंतर तीन चौकोन एका रेषेत येतील असे लावा.
७) त्यानंतर तिन्ही चौकानाच्या बिळातून एक तार टाका आणि दोन्ही बाजूने तारेला पिळ देऊन लॉक करा. बॉक्सचे झाकण उघडणे बंद करणे सोरे होईल.
८) छोटा स्पंज बॉक्समध्ये ठेवून त्याच्या मधोमध एक खाच तयार करून त्यात अंगठी ठेवा.

हेही वाचा – Coconut Peel : नारळाच्या शेंड्या फेकून देताय? पण त्याचे आहेत अनेक फायदे, कसा करू शकता त्यांचा वापर, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. तुम्हालाही टाकाऊ पासून टिकावू वस्तू तयार करायला आवडत असेल नारळाच्या करवंटीपासून अंगठीचा बॉक्स नक्की तयार करून पाहा.