How To Clean Burnt Cooker: स्वयंपाक करताना बऱ्याचदा कुकरमध्ये तांदूळ आणि डाळ जळते. कधी कधी हे पदार्थ इतके जळतात की, कुकर आतून आणि बाहेरून पूर्णपणे काळा पडतो. मग असा काळा पडलेला कुकर स्वच्छ करणे खूप कठीण होऊन जाते. अनेकदा कुरक स्वच्छ करण्यासाठी रात्रभर पाण्यात ठेवून, सकाळी तो स्वच्छ करावा लागतो. कधी कधी त्यावरील डाग इतके हट्टी असतात की, अनेकदा प्रयत्न करूनही ते साफ होत नाहीत. जर तुमच्याकडूनही अशा प्रकारे कुकर खराब होत असेल, तर एका सोप्या उपायाने तुम्ही ते डाग दूर करू शकता.

कुकर साफ करण्यासाठी साहित्य:

  • २ ते ३ चमचे बेकिंग सोडा
  • १ कप पांढरे व्हिनेगर
  • पाणी
  • स्टील स्क्रबर
  • लिंबू

कुकर अशा प्रकारे स्वच्छ करा

कुकर स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम कुकर पाण्यात भिजवा. आता पाण्यात २-३ चमने बेकिंग सोडा टाका. खरं तर बेकिंग सोडा जळालेला भाग स्वच्छ करण्यास मदत करतो. आता त्यात पांढरे व्हिनेगर घाला. आता कुकर गॅसवर ठेवा आणि १०-१५ मिनिटे मंद आचेवर उकळवा. त्यावेळी कुकरवर झाकण ठेवू नका. काही वेळाने कुकर गॅसवरून उतरवून, थंड होऊ द्या. आता स्क्रबरच्या मदतीने तो हळुवारपणे स्वच्छ करा. त्यामुळे जळाल्याने पडलेले डाग सहज निघून जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.