Tips to remove bed bugs: दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलसह बुसान, इंचॉंन या शहरांमध्ये ढेकणांचा उच्छाद वाढला आहे. नागरिक ढेकणांमुळे त्रस्त झाले आहे दरम्यान प्रशासनाने ढेकणांना नष्ट करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. दक्षिण कोरियाप्रमाणे आपल्याकडेही अनेकदा कोंदड वातावरण, अस्वच्छता आणि हवेतील आद्रता वाढल्यामुळे गादी, सोफा किंवा अंथरुणामध्ये ढेकूण होऊ शकतात. जेव्हा रात्री कोणी या अथंरुणावर किंवा गादीवर झोपते तेव्हा ते त्यांची झोप उडवतात. रात्रभर सर्वत्र चावून ते सर्वांना हैराण करतात. तसेच ढेकूण चावल्यामुळे आरोग्याची समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. अशा स्थितीमध्ये जर ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून वैतागला असाल तर काळजी करू नका आम्ही तुमची मदत करणार आहोत. या लेखात काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे ढेकूण झटपट गायब होतील.

ढेकणांपासून सुटका मिळवण्याच्या सोप्या टिप्स (Tips to remove bed bugs)

व्हिनेगर
जर तुमच्या घरातही ढेकूण झाले असतील तर व्हिनेगर अत्यंत फायदेशीर ठरू शकते ज्या गादीवर किंवा अंथरुणामध्ये ढेकूण झाले आहेत ते उन्हात सुकवा. त्यानंतर त्यावर व्हिनेगर शिंपडा. एका स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर भरून तुम्ही शिंपडू शकता. जास्त तापमान आणि व्हिनेगरच्या वासामुळे ढेकूण गादी आणि अंथरुणातून निघून जातील.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
ढेकणांच्या समस्येने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

बेकिंग सोडा
ढेकूणांपासून सुटका मिळवण्याच्या सोप्या टिप्स. अथंरुणांच्या फटींमध्ये, चादर, गादी किंवा लाकडी सामानावर बेकिंग सोडा टाका त्यामुळे ढेकूण निघून जातील.

कडूलिंबाचा पाला
कडूलिंबाचा पाला किंवा कडूलिंबाचे तेल देखील ढेकणांना पळवून लावण्यासाठी प्रभावी आहे. कडूलिंबाचा पाला जिथे ढेकूण झाले तिथे ठेवून द्या. तुम्ही लिंबाचे तेल देखील स्प्रे करू शकता. त्यामुळे ढेकूण गायब होतील.

हेही वाचा – जेवणातील जास्तीचं तेल काढण्याचा हटके जुगाड, ‘असा’ करा बर्फाचा वापर; Viral Video पाहून व्हाल थक्क!

दालचिनी
दालचिनी देखील ढेकूणांना पळवून लावण्यासाठी उपयूक्त ठरू शकते. तुम्हाला जर एका भांड्यामध्ये दालचीनी, आले किंवा काली मिरे आणि लवंग कुटून घ्या. हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी चांगले उकळू द्या. उकळून निम्मे होईपर्यंत उकळा. त्यांनतर थंड झाल्यावर हे पाणी स्प्रे बाटलीमध्ये भरून ढेकूण झालेल्या ठिकाणी शिंपडा. खोलीचे वातावरण उष्ण ठेवा. काही वेळात ढेकूण मरून जातील.

कांद्याचा रस

ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत उपुयक्त ठरेल. कांद्याच्या रसाच्या वास ढेकाणांना सहन होत नाही आणि ते मरतात. त्यामुळे ज्या ठिकाणी ढेकणांचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी कांद्या रस शिंपडा.

निलगिरी, रोजमेरी आणि लव्हेंडर तेल
निलगिरीचे तेलही ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. जिथे ढेकूण आहे तिथे निलगिरीच्या तेलाचे थेंब शिंपडा. तसेच निलगिरीच्या तेलात रोजमेरी, लव्हेंडर तेलही एकत्र करून वापरू शकता. लव्हेंडरची पाने अंथरुणावर किंवा कपड्यांवर घासल्यास ढेकूण निघून जातील.

पुदीन्याची पाने
पुदीन्याच्या वासामुळेही ढेकणांना त्रास होतो . त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणाशेजारी पुदीण्याची पाने ठेवा.

या शिवाय ढेकूण होऊ नये म्हणून घरात स्वच्छता ठेवा, घरातील कोंदट वातावरण होऊ देऊ नका, घरात पुरेपूर सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या आणि वेळोवेळी पेस्ट कंट्रोल करा.

हेही वाचा – फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सीताफळ खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

ढेकूण होण्याची कारणे –

१. कुजलेले लाकूड किंवा ओलसर जागेमध्ये ढेकणांची पैदास लवकर होते.

२. घरात अस्वच्छता असेल तर लगेच तिथे ढेकूण होऊ शकतात

३. घरात पुरेसा सुर्यप्रकाश येत नसेल तर ढेकणांचा प्रादुर्भाव वाढतो.

४. सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ढेकूण वर्षानुवर्षे राहतो आणि ६५ दिवस तो अन्नाशिवाय जगू शकतो.