आपल्या रोजच्या आयुष्यात ताणतणाव आणि अपुर्‍या झोपेमुळे थकवा येणे चिडचिड होणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अधिक ताण पडल्याने यांचा शरीरावर परिणाम होतो. तसेच यामध्ये इन्सोमेनिया म्हणजे एखाद्या व्यक्तीला होणारा निद्रानाश हा देखील ताणतणाव निर्माण करतो. नोकरी नसल्याचा, आपल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू किंवा इतर गोष्टींचा ताण येणे, याबरोबरच नैराश्य, ताणतणाव, अंगदुखी, थकवा तसेच झोप न लागणे, झोपेच्या वेळेत बदल होणे या सर्व समस्या दूर करण्यासाठी दररोज आपण योगा करणे महत्वाचे आहे. योगामुळे आपल्या शरीरातील ताणतणाव देखील दूर होतो. या करिता योगाभ्यासातील आपण जर योग मुद्रा किंवा हाताच्या हालचालींचा वापर केला तर तो शरीरात ऊर्जा प्रवाह निर्माण करण्याचा आणि शरीराला आराम देण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो. चला तर मग जाणून घेऊयात योग मुद्रा आणि त्यांचे फायदे.

ज्ञान मुद्रा :

* ज्ञान मुद्रा केल्याने तुमची मानसिक स्थिती अधिक सक्षम होते. याकरता ध्यान व चिंतन करणे गरजेचे आहे.

* यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह वाढतो.

* एकचित्तमनाने ध्यान केल्याने आपले लक्ष केंद्रीत होऊन शरीराला आराम मिळतो.

* ज्ञान मुद्रा केल्याने डोके दुखी दूर होते. तसेच इन्सोमेनिया (निद्रानाश), मधुमेहसारख्या समस्या दूर होतात.

चिन मुद्रा :

अंगठा आणि तर्जनी या दोघांना हलके एकत्र धरा आणि इतर तीन बोटे ताठ ठेवा. ही झाली चिन मुद्रा. अंगठा आणि तर्जनी यांचा एकमेकांना हलका स्पर्श होऊ द्या, दाब देऊ नका आणि इतर तीन बोटांना जितके शक्य होईल तितके ताठ ठेवा. तळवे वरच्या दिशेला ठेवून हात मांडीवर ठेवू शकता.

चिन्मय मुद्रा :

या मुद्रेमध्ये, अंगठा आणि तर्जनी यांचे वर्तुळ बनते आणि इतर तीन बोटे हाताच्या तळव्यात वलयाकार बंद करा. पुन्हा तळवे वरच्या दिशेला ठेवून हात मांडीवर ठेवा आणि खोल दीर्घ श्वास घ्या.

आदि मुद्रा :

आदि मुद्रेमध्ये अंगठ्याला करंगळीच्या खालच्या टोकावर ठेवावे आणि इतर बोटे अश्या प्रकारे बंद करावीत जेणेकरून हलकी मूठ बनेल. पुन्हा तळवे वरच्या दिशेला ठेवून हात मांडीवर ठेवावेत आणि श्वासोच्छवासाची पुनरावृत्ती करावी.

ब्रम्ह मुद्रा :

यामध्ये प्रथम दोन्ही हातांची आदि मुद्रा करावी आणि नंतर बोटांच्या मागच्या सांध्यांची हाडे एकत्र आणावीत व हात वरच्या दिशेला राहतील अश्या प्रकारे नाभी परिसरात ठेवावे आणि श्वासाचा ओघ सुरूच ठेवावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप :- सदर टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरच अथवा मानसशास्त्र तज्ञांचा सल्ला घ्यावा. )