चॉकलेटचे नाव ऐकले की अगदी लहान मुलांपासून ते मोठयांच्या तोंडातही पाणी येते. मात्र, काहींचा समज आहे की चॉकलेट खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि परिणामी वजनही वाढते, तर हा गैरसमज आहे. पण, जर तुम्ही जास्त चॉकलेट खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते. चॉ़कलेटमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी गुणकारी असतात हे तर सर्वांना माहितच आहे. त्याचसोबत चॉकलेट हे खोकल्यावरदेखील गुणकारी आहे. चॉकलेटबाबत संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार चॉकलेट खाल्ल्याने खोकला कमी होऊ शकतो. अगदी जुन्या खोकल्यावरही चॉकलेट गुणकारी औषध म्हणून उपयुक्त ठरते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने ब्रिटेनमध्ये ३०० लोकांवर वैद्यकिय चाचणी केली. त्यामध्ये, त्याच्या आधी करण्यात आलेल्या परीक्षणात चॉकलेटमुळे ६० टक्के लोकांना दिलासा मिळाल्याचे कळले.
डार्क चॉकलेटमध्ये विशिष्ट घटक असतात. त्याचे रोज सेवन केल्यास फायदा होतो. डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइनचे प्रमाण एक हजार मिलिग्रॅम असते. गोड नसलेल्या डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन ४५० मिलिग्रॅम तर गोड डार्क चॉकलेटमध्ये १५० मिलीग्रॅम असते. विशिष्य काळ चॉकलेट खाल्ले तर त्याचा चांगला परिणाम होतो. थिओब्रोमाइनमुळे संवेदनशील नस काही प्रमाणात मंदावते. त्यामुळे खोकल्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2013 रोजी प्रकाशित
चॉकलेट खा, खोकला टाळा!
चॉकलेटचे नाव ऐकले की अगदी लहान मुलांपासून ते मोठयांच्या तोंडातही पाणी येते.
First published on: 19-08-2013 at 02:36 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat chocolate and avoid coughing