आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेकजण मोठ्या भक्तिभावाने भाविक पूजा अर्चना करून नऊ दिवस उपवास करतात. या दिवसात अनेकांचे संपूर्ण नऊ दिवस उपवास असतात. त्याचबरोबर शरीराला डिटॉक्स करण्याचा उत्तम उपाय म्हणजे उपवास. मात्र उपवासा दरम्यान शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते आणि कधीकधी अशक्तपणामुळे चक्कर येते. तुम्ही देखील नवरात्रीत उपवास करताय तर तुमच्या आहारात काही अशा गोष्टींचा समावेश करा जेणेकरून तुम्हाला उपवास करताना अशक्तपणा व कमकुवत वाटणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात अशा आरोग्यदायी पदार्थांबद्दल जे तुम्ही नवरात्रीच्या उपवासात घेऊ शकता. हे अन्न तुम्हाला उपवासात ऊर्जा देईल.

जिरे धणे आणि बडीशेप हर्बल टी

दुधाच्या चहापेक्षा हर्बल चहा अधिक फायदेशीर आहे. हर्बल चहा हा आयुर्वेदातील औषधासारखाच आहे. उपवासाच्या दरम्यान तुम्ही एका पातेल्यात एक चमचा जिरे, एक चमचा संपूर्ण धणे, एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात नीट उकळून घ्या. त्यानंतर त्याचे सेवन करा. हा चहा तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकेल तसेच पचन क्रिया निरोगी ठेवेल. हा हर्बल चहा तुमच्या सिस्टमला डिटॉक्स करतो. त्याचबरोबर हा चहा ऊतींमधील विष बाहेर काढून टाकण्याचे काम करतो.

आहारात शेंगदाण्यांचा समावेश करा

जर तुम्ही नवरात्री दरम्यान ९ दिवस उपवास करत असाल तर तुमच्या रोजच्या आहारात नटांचा समावेश नक्की करा. मखाना, अक्रोड, बदाम, काजू, शेंगदाणे आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स शरीराला ऊर्जा देतील, तसेच शरीराची कमजोरी दूर करतील.

उपवासा दरम्यान कोमट पाणी प्या

उपवासादरम्यान तुम्ही कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहील तसेच शरीराची कमजोरी देखील दूर होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंबू चहा प्या

उपवासादरम्यान लिंबाचा चहा तुमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात लाभ देईल. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी ऊर्जा देण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवते.ज्या लोकांना गॅस, बद्धकोष्ठता, अपचन समस्या आहे त्यांनी लिंबू चहा घ्यावा. हा चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करा आणि नंतर त्यात थोडीशी चहा पावडर आणि साखर घाला. उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि काचेच्या किंवा कपमध्ये गाळून घ्या. या चहामध्ये तुम्ही चवीनुसार लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करा.