गर्भधारणेदरम्यान थंड पाण्यातील मासे खाल्ल्याने शरीराला मोठय़ा प्रमाणात ओमेगा-३ स्निग्ध आम्ल (फॅटी अ‍ॅसिड) मिळते. ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर असून, त्यामुळे जन्माला येणाऱ्या गर्भास होणारा दम्याचा विकार जवळजवळ एकतृतीयांशाने कमी होत असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

Observation of flamingo deaths due to pollution and streetlights
नवी मुंबई : प्रदूषण, पथदिव्यांमुळे फ्लेमिंगो मृत झाल्याचे निरीक्षण
Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’

गर्भधारणा झालेल्या महिलेला तिसऱ्या तिमाहीत २.४ ग्रॅम ओमेगा-३ चा पूरक आहार दिल्यास जन्माला येणाऱ्या मुलाला दमा होण्याचा धोका ३१ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

ओमेगा-३ स्निग्ध आम्लमध्ये इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्झानोईक अ‍ॅसिड (डीएचए) असते. ते थंड पाण्यातील माशांमध्ये आढळून येते. यामुळे मानवी प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ओमेगा-३ आम्लामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात. काही प्रदेशात ओमेगा-३ कमी घेतले जाते, तेथे लहान मुलांना दमा होण्याचे प्रमाण जास्त आढळून आले, असे लहान मुलांना होणाऱ्या दम्यावर अभ्यास करणारे डेन्मार्कमधील प्राध्यापक हान्स बिसगार्ड यांनी म्हटले आहे. अभ्यासात दमा आणि ओमेगा न घेण्याचे परिणाम निश्चित आणि लक्षणीय प्रमाणात दिसून आल्याचे त्यांनी म्हटले.

रक्तामध्ये ओमेगा-३ स्निग्ध आम्ल योग्य प्रमाणात गेल्यामुळे अचूक आणि मुबलक प्रमाणात पोषक तत्त्वे शरीराला मिळतात. तसेच ज्या महिलांच्या रक्तामध्ये ईपीए आणि डीएचए यांचे प्रमाण कमी होते, त्यांना पूरक आहार दिल्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये दमा होण्याचा धोका ५४ टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधकांना अभ्यासात दिसून आले. सध्या शाळेच्या वयापासून पाच तरुण मुलांपैकी एका मुलाला दमा अथवा संबंधित विकार आहे. हे संशोधन ‘मेडिसिन’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)