पोट आणि कंबर यावर वाढलेली चरबी बांधा सुडौल दिसण्यासाठी आणि आरोग्यासाठीही घातकच असते. स्त्रिया आणि पुरुषांकडून या चरबीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाय केले जातात. कधी जिमला जाऊन तर कधी डाएट करुन ही चरबी घटविण्याचा प्रयत्न केला जातो. हे करणे योग्य असले तरीही भारतीय परंपरेत सांगितलेला योगही शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. आता अशी कोणती योगासने आहेत ज्यामुळे शरीरावरील अनावश्यक चरबी घटण्यास मदत होते, पाहूयात….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुजंगासन

हे आसन करायला सोपे असून त्यामुळे चरबी घटण्यास मदत होते. सुरुवातीला पालथे झोपावे, हात कंबरेजवळ आणून कंबरेतून वर मागच्या दिशेला वळावे. यावेळी पाय एकमेकाला जोडलेले असावेत. या आसनामध्ये पोटाचे स्नायू आणि कंबरेवर ताण आल्याने तेथील चरबी घटण्यास मदत होते. या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होण्यासही मदत होते.

धनुरासन

या आसनामुळे शरीराच्या स्नायूंची लवचिकता वाढते. यासोबतच पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत होते. या आसनामुळे चरबी घटण्यास मदत होतेच त्याशिवाय संपूर्ण शरीराला या आसनाचा चांगला उपयोग होतो. पालथे झोपून दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडावेत. मागच्या बाजूने पाय आणि छातीचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पोट आणि कंबर यांच्यावर ताण येऊन तेथील चरबी कमी होण्यास मदत होते.

अपघात टाळायचा असेल तर ही बातमी वाचाच!

 

बलासन

हेही चरबी घटण्यासाठी एक उत्तम आसन आहे. पाय गुडघ्यात वाकवून बसावे. त्यानंतर डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हे करताना पार्श्वभाग टाचांना चिकटलेला राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर हात मागच्या दिशेला पायांना समांतर ठेवावेत. या स्थितीत जास्त काळ राहील्यास त्याचा आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी उपयोग होतो. सुरुवातीला हे आसन टिकवण्यास वेळ लागतो मात्र त्यानंतर हळूहळू जमायला लागते.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा अनेक समस्यांवरील एक उत्तम व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक स्थितीमुळे विशिष्ट अवयवांना चांगला व्यायाम होतो. नियमित सूर्यनमस्कार घातल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. म्हणून रोज किमान १२ सूर्यनमस्कार रोज घालण्याचा प्रयत्न करावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effective yoga for reducing belly and back fats
First published on: 22-02-2018 at 16:58 IST