Mahanirmiti Koradi Bharti 2024: महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण १९६ पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहे. जर तु्म्हाला महानिर्मिती कोराडी येथे अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. नागपूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. वरील पदांसाठी अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आणि या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – महानिर्मिती कोराडी अंतर्गत खालील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Navi Mumbai, construction sites, SOP, noise pollution, air pollution, blasting, CCTV, Municipal Corporation, redevelopment, Kailas Shinde, regulations, navi Mumbai, navi Mumbai news
बांधकामस्थळी सीसीटीव्हींचा पहारा, नवी मुंबईतील बांधकाम नियमावली व तक्रार निवारणाबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Indian Bank Recruitment 2024 Bank job news Indian bank recruitment for 300 posts
Indian Bank: बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी; इंडियन बँकेत थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
High Level Committee, Infectious Diseases,
संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Mumbai, MHADA 2030 House Allotment Applications, application process, technical difficulties, online workshop, house lottery
म्हाडाची सोडतपूर्व प्रक्रिया समजून घेण्याची संधी, माहितीसाठी उद्या ऑनलाइन कार्यशाळा
RRB Railway Paramedical Recruitment 2024
Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत ‘या’ १३७६ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
  • वायरमन
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
  • वेल्डर
  • ITESM
  • कोपा
  • टर्नर
  • मशिनिस्ट
  • फिटर
  • इलेक्ट्रीशियन
  • पॉवर इलेक्ट्रीशियन
  • मशिनिस्ट (ग्राइंडर)

पदसंख्या – महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या 196 जागा रिक्त जागा भरण्यासाठी ही अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे.

  • वायरमन – २०
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ११
  • वेल्डर – २०
  • ITESM – २०
  • कोपा – २५
  • टर्नर – १०
  • मशिनिस्ट – ०५
  • फिटर – ४०
  • इलेक्ट्रीशियन – २५
  • पॉवर इलेक्ट्रीशियन – १५
  • मशिनिस्ट (ग्राइंडर) – ०५

हेही वाचा : BOI Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजचं करा अर्ज

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.

अर्ज पद्धती – अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ एप्रिल २०२४ पर्यंत तुम्ही वरील पदांसाठी अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://mahagenco.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी https://mahabharti.in/mahanirmiti-koradi-bharti-2024/ या लिंकवर क्लिक करावे आणि अधिकृत अधिसूचना नीट वाचावी.

हेही वाचा : ICT Bharti 2024: मुंबई ICT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; विविध पदांकरीता भरती सुरु, लवकर करा अर्ज

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी वरील अधिकृत अधिसुचना नीट वाचावी.
  • अर्ज ०५ एप्रिल २०२४ या शेवटच्या तारखेपूर्वी भरावा.
  • विचारलेली माहिती पूर्ण भरावी. अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.